प्रकृती बिघडल्यामुळे रजनीकांत यांची मोठी सर्जरी, काय झालं नक्की?

रजनीकांत यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात...

Updated: Oct 30, 2021, 09:59 AM IST
प्रकृती बिघडल्यामुळे रजनीकांत यांची मोठी सर्जरी, काय झालं नक्की?   title=

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रजनीकांत  यांच्या मेंदूला रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शुक्रवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याची प्रकृती आता चांगली होत आहे. रजनीकांत यांना 28 ऑक्टोबरला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयाने सांगितले.

कावेरी हॉस्पिटलने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, 'रजनीकांतच्या प्रकृतीचे डॉक्टरांच्या तज्ञ पॅनेलने कसून मूल्यांकन केले आणि त्यांना कार्टॉइड आर्टरी रिव्हॅस्क्युलरायझेशन (सीएआर) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णालयाचे सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वाराज यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की ही प्रक्रिया शुक्रवारी यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि ते बरे होत आहेत. 

सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल

प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. प्रख्यात सर्जन डॉ. जे. अमलोरपवनाथन यांनी स्पष्ट केले की CAR ही मेंदूला रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा रूटिन चेकअपसाठी रुग्णालयात आले असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. 

अखेर डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला दिला आहे. आता रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरचं घरी परततील अशी  शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आहे.  त्यामुळे रजनीकांत पुन्हा घरी परततील या प्रतीक्षेत त्यांचे चाहते आणि कुटुंबिय आहेत.