...म्हणून पती डॅनियलनं पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकलं, सनीचा खुलासा

सनी-डॅनियलचं नातं खूप जूनं आहे... 

Updated: Aug 24, 2018, 04:54 PM IST
...म्हणून पती डॅनियलनं पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकलं, सनीचा खुलासा title=

मुंबई : 'बिग बॉस'च्या सीझन ५ पासून भारतात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सनी लिओन सध्या खूपच चर्चेत आहे... ही चर्चा होतेय तिच्या आयुष्यावर आधारीत 'करनजीत कौर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन' या बायोपिकमुळे... या वेब सीरिजमध्ये सनीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्यात... या बेव सीरिजमध्ये सनीनं पती डॅनियलबद्दलही अनेक गोष्टींचा उलगडा केलाय... आयुष्यातील काही घडामोडींमुळे सनीनं पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकलं पण, डॅनियलनं हा मार्ग का स्वीकारला? या प्रश्नाचं उत्तरही यामध्ये दिलंय. 

'डॅनियलनं अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत माझ्यामुळेच काम करणं सुरू केलं होतं. इतरांसोबत मी अडल्ट सिनेमांत काम करताना पाहणं डॅनियलला पसंत नव्हतं... डॅनियलनं माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलंय. त्यानंच मला विश्वास दिला की अशी कोणतीही गोष्ट नाही जी पूर्ण होऊ शकत नाही' असं सनीनं म्हटलंय. 

Sunny Leone and Daniel Weber with their 3 children

सनी-डॅनियलचं नातं खूप जूनं आहे. आत्तापर्यंत सनीच्या आयुष्यातील तिच्या प्रत्येक निर्णयाला डॅनियलनं मनापासून साथ दिलीय. काही दिवसांपूर्वीच दोघांनी सरोगसी पद्धतीनं दोन मुलांना जन्म दिलाय. याशिवाय सनीनं गेल्या वर्षी एका मुलीलाही दत्तक घेतलंय. 

सध्या सनी 'स्पिटव्हिला' या कार्यक्रमात होस्ट म्हणून दिसतेय. लवकरच आणखी एका सिनेमातूनही ती प्रेक्षकांसमोर येणार आहे. सनी सध्या आपल्या मुलांसोबतही जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतेय.