सनी विमान अपघातातून थोडक्यात वाचली... पाहा, व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन विमान अपघातातून थोडक्यात वाचलीय. 

Updated: Jun 1, 2017, 02:56 PM IST
सनी विमान अपघातातून थोडक्यात वाचली... पाहा, व्हिडिओ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन विमान अपघातातून थोडक्यात वाचलीय. 

महाराष्ट्रात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या सनीच्या खाजगी विमानाला अपघात होता होता राहिला. यावेळी सनीसोबत तिचा पती आणि मित्रही विमानात होते. 

खराब वातावरणामुळे हा अपघात होणार होता. परंतु, पायलटच्या समयसूचकतेमुळे हा अपघात होता होता राहिला. 'देवाच्या कृपेनं आम्ही सगळे आज जिवंत आहोत. आमच्या विमानाला अपघात झाला. देवाचे आभार मानत आता आम्ही घरी परतत आहोत' असं म्हणत सनीनं आपल्या चाहत्यांना दिलासा दिलाय. 

सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी पायलटनं शानदार काम केलंय, असं म्हणत सनीनं पायलटचेही आभार मानलेत.