तुम्हाला लाज वाटत नाही का? मुलाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवर संतापलेला सनी देओल

Sunny Deol : सनी देओलच्या मुलाच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी त्याच्या मुलाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवर सनी संतापल्याचे अभिनेत्यानं स्वत: सांगितले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 13, 2023, 01:01 PM IST
तुम्हाला लाज वाटत नाही का? मुलाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवर संतापलेला सनी देओल title=
(Photo Credit : Social Media)

Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासोबत सनी देओल त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सनी देओलच्या मुलाचं लग्न झालं. त्यावेळी सोशल मीडियावर त्यानं काही ठराविक फोटो शेअर केले होते. त्याच्या लग्नात सावत्र आई हेमा मालिनी आणि सावत्र बहीण ईशा देओलनं देखील हजेरी लावली नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात असलेला मोठा वाद समोर आल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सनी देओलनं त्याच्या मुलाच्या लग्नातील एक किस्सा सांगत पाहुण्यांवर असलेला राग व्यक्त केला आहे. त्यावेळी त्यानं पाहुण्यानं लाज वाटत नाही का? असं थेट म्हटलं आहे. 

रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्या मुलाच्या लग्नातील किस्सा सांगत सनी देओल म्हणाला, घरात लग्नाचं वातावरण होतं. त्यामुळे बरेच पाहुणे हे आमच्या घरी रहायला आले होते. तेव्हा मी पाहिलं की त्यापैकी बरेच पाहुणे कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. हे सर्व पाहून मला खूप राग आला. मी अनेकांना फटकारलं. असं काही करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? असं मी त्यांना थेट म्हणालो. थोड्या वेळानंतर मी पाहिलं की सर्वच जण आपापल्या फोनवर कार्यक्रमाचे व्हिडीओ रेकॉर्ड करत आहेत. जेव्हा मला समजलं की मी आता प्रत्येकाला रोखू शकत नाही, तेव्हा मी शांत बसलो. कारण प्रत्येकाकडे जाऊन मी त्यांना थांबवू शकत नव्हतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Jawan Box Office Collection Day 6: सहाव्या दिवशी शाहरुखचा 'जवान' मोडू शकला नाही Gadar 2 चा रेकॉर्ड!

पुढे सनी याविषयी बोलताना म्हणाला की 'जेव्हापासून सोशल मीडिया आलं आहे, तेव्हापासून ज्या लोकांना काही काम नसतं त्यांना वेळ घालवण्यासाठी एक साधन मिळालं आहे. त्यांची काही ओळख तर नसतेच, ना त्यांचा चेहरा दिसतो. त्यामुळे त्यांना जे करायचं असेल ते करतात. कोणाला काहीही बोलतात. ज्या व्यक्तीबद्दल आपण इतकं वाईट बोलतोय, त्याला किती दु:ख होईल याचा विचार ते करत नाहीत. ते फक्त स्वत:चा विचार करतात. स्वत:ला गंमत वाटावी म्हणून काहीही लिहितात.' सनी देओल मुलगा करण देओलनं 18 जून रोजी गर्लफ्रेंडशी लग्न केलं. त्यांच्या लग्नात मोजकेच पाहुणे देखील उपस्थित होते.