आयकर विभागानं छापे टाकले अन् कळली 'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्रीची श्रीमंती, पाहा काय काय सापडलं?

Jayalalithaa IT Raid: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका अभिनेत्रीची. जिची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे तिच्या मानधनावरून आणि तिच्या एकूणच नेटवर्थवरून. तिच्या दहा हजार साड्या, सोनं, चांदी अशी मालमत्ता आढळली आहे. त्यामुळे आजच्या अभिनेत्रींचीही कमाई यातून गळून पडेल. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 13, 2023, 12:45 PM IST
आयकर विभागानं छापे टाकले अन् कळली 'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्रीची श्रीमंती, पाहा काय काय सापडलं?  title=
Jayalalithaa networth once caught in it raid know the interesting facts about her

Jayalalithaa Networth: आपल्याला माहितीच आहे की अभिनेत्रींचा तामझाम हा फारच जास्त असतो. त्यातून ग्लॅमरला चटावणारं असं हे क्षेत्र असल्यानं सध्या त्याची फारच चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अभिनेत्रींच्या फॅशन आणि स्टाईल्सची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून यावेळी त्यांची चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या नेटवर्थची. अभिनेत्रींचे मानधन किती ते त्यांचे नेटवर्थ किती याचीही जोरात चर्चा रंगलेली असते. कोणत्या चित्रपटासाठी कोणत्या अभिनेत्रीनं किती मानधन घेतलं याही चर्चा रंगलेली असते. कोण किती महागडी अभिनेत्री आहे याचीही जोरात चर्चा असते. त्यातून नाना तऱ्हेचे निष्कर्ष काढले जातात. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्रीची. जिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तुम्हाला कल्पना नसेल परंतु आज अभिनेत्रींच्या नेटवर्थची, कमाईची चर्चा केली जाते परंतु तुम्हाला माहितीये का की त्याआधीही अशी एक अभिनेत्री होती जिच्या नेटवर्थची तूफान चर्चा रंगेलली पाहायला मिळाली होती. 

तुम्हाला माहितीये का या अभिनेत्रीचे नावं आहे? या अभिनेत्रीचे नावं आहे जयललिता. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की जयललिता यांच्याकडे प्रचंड मोठी मालमत्ता होती. त्यातून त्यांच्याकडे साड्यांचा कलेक्शन म्हणजे काही विचारू नका. त्यांच्याकडे दहा हजारांचे साड्यांचे कलेक्शन होते. त्यांच्या साडे दहा हजार किंवा त्याहूनही अधिक साड्या होत्या. त्यातून त्यांच्याकडे 28 किलो सोनं आणि 800 किलो चांदी होतं. सोबतच त्यांच्याकडे 750 चपला होत्या, 91 घड्याळं होती. त्यांच्या या मालमत्तेची अनेकदा चौकशी झाली आहे. त्यातून 2016 साली झालेल्या त्यांच्या मालमत्तेच्या तपासावेळी त्यांच्याकडे 1250 किलो चांदी आणि 21 किलो सोनं आढळलं होतं. अभिनय सोडल्यानंतर 1991 ते 2016 या 25 वर्षांत 5 वेळा तामिळनाडूची मुख्यमंत्रीही होत्या. 

पडेल होते आयटीचे छापे:

जयललिता या अम्मा नावानं खूप लोकप्रिय होत्या. त्यांनी त्या नावानं कॅन्टीनही सुरू केले होते. 5 डिसेंबर 2016 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची संपत्ती ही अनेक वर्षे अनेकदा वादात राहिली होती. त्यांच्यावर अनेक आयकर छापे पडले होते. वर दिलेली माहिती ही त्याच छाप्यातून आली आहे. 

त्यांचे अनेक लोकप्रिय चित्रपट गाजले होते त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतारासाठीही लोकप्रिय होत्या. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटही आला होता. अभिनेत्री कंगना राणावतनं त्यांची भुमिका केली होती. या चित्रपटाची चर्चा खूप रंगली होती परंतु त्यातूनही हा चित्रपट फारसा बॉक्स ऑफिसवर चालला नाही.