'मी जाट आहे, डोके कापल्यानंतरही शस्त्र सोडत नाही', सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांना बसला धक्का

सनी देओलने 'जाट' चित्रपटामधून करणार दमदार पुनरागमन! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये अॅक्शन, थरार आणि स्टंटचा धमाका पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 9, 2024, 07:58 PM IST
'मी जाट आहे, डोके कापल्यानंतरही शस्त्र सोडत नाही', सनी देओलच्या  'जाट' चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांना बसला धक्का title=

Sunny Deol : सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसला वन-मॅन आर्मी लुक; दमदार अॅक्शन आणि मनोरंजनने परिपूर्ण असणारा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्याने चाहत्यांना अक्षरशः थक्क करून टाकले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अॅक्शन सुपरस्टार परत आला आहे, असं नक्कीच म्हणावं लागेल.  काही दिवसांपूर्वी ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' च्या विशेष प्रीमियर दरम्यान 'जाट' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. 12,500 स्क्रीनवर हा टीझर दाखवण्यात आला. ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी बाब आहे. 

जेव्हा या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा सर्व प्रेक्षकांची एनर्जी अफलातून होती. सनी देओलच्या दमदार अभिनयाने आणि थरारक अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांनी जोरदार शिट्ट्या आणि टाळ्यांच्या माध्यमातून  प्रतिसाद दाखवला. टीझरने चाहत्यांना खुर्चीला खिळवून ठेवले. यावरुन हे पुन्हा सिद्ध झाले की सनी देओल भारतीय सिनेसृष्टीतील खरा अॅक्शन हिरो आहे.

'जाट' चित्रपटाच्या टीझरमध्ये काय? 

'जाट' चित्रपटाच्या टीझरमध्ये सुरुवात काही लोकांना कोणीतरी बेदम मारहाण करून छताला लटकवण्यापासून होत आहे. हे काम कोणी केले माहीत नाही. मग कोणी विचारले की तो कोण आहे. कुठून आला आहे? तो तुमच्या मागे का लागला आहे? मग दुसरा माणूस आत येतो आणि या प्रकरणी सर्व माहित सांगतो. तो संध्याकाळच्या सावलीत येतो आणि प्रकाशाच्या आधी अदृश्य होतो. त्यानंतर सनी देओलचा प्रवेश होतो. ज्याचा चेहरा हळूवारपणे दाखवण्यात आला आहे. टीझरमध्ये तो लढताना दिसत आहे. या टीझरमध्ये त्याचा एक डायलॉग आहे. तो म्हणतो 'मी जाट आहे. डोके कापल्यानंतरही शस्त्र सोडत नाही'.

टीझर म्हणजे 'जाट' या सिनेमातील भव्य दृश्यांची केवळ एक झलक आहे. सिनेमाच्या रिलीजसाठी काउंटडाउन सुरू झाल्यामुळे, चाहते आता एप्रिल 2025 मध्ये सिनेमागृहात हा रोमांचक प्रवास अनुभवण्याची प्रतिक्षा करत असतील, असा विश्वास वाटतो आहे. या चित्रपटाच्या टीझरवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.