'नवाजुद्दीन... महिलांचा आदर करणं ना तुला तेव्हा जमलं ना आत्ता'

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अनेक वादांत अडकताना दिसतोय.

Updated: Oct 28, 2017, 09:43 PM IST
'नवाजुद्दीन... महिलांचा आदर करणं ना तुला तेव्हा जमलं ना आत्ता'  title=

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अनेक वादांत अडकताना दिसतोय.

नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत थिएटरमध्ये कलाकार म्हणून काम करणाऱ्या सुनीता राजवार यांनी नवाजुद्दीनला 'हीन प्रवृत्तीचा व्यक्ती' म्हटलंय. शुक्रवारी एक फेसबुक पोस्ट लिहून 'नवाजुद्दीन तुला महिलांचा मान राखत येत नाही' असं त्यांनी म्हटलंय. 

सुनीता राजवार यांनी नवाजुद्दीनसोबत थिएटरमध्ये काम केलंय. नवाजुद्दीननं ' An Ordinary Life: A Memoir' या पुस्ताकात सुनीता यांचा उल्लेख आपलं पहिलं प्रेम म्हणून केलाय. नवाजनं आपल्या या पुस्तकात केवळ सुनीता नाही तर आपल्या अनेक अफेअर्सचा खुलासा केलाय. यामध्ये त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींपासून हॉटेलच्या वेट्रेसपर्यंत अनेक महिलांचा समावेश आहे. 

सुनीता यांनी केवळ आपण गरीब असल्यानं आपल्याला नाकारलं असंही नवाजुद्दीननं आपल्या पुस्तकात म्हटलंय. बेरोजगार असल्यानं सुनीता आणि माझं ब्रेकअप झालं... यावेळी आपल्या मनात आत्महत्येचेही विचार येऊन गेले. यानंतर आपला प्रेमावरचा आणि महिलांवरचा विश्वास उडाला... असंही नवाजुद्दीननं म्हटलंय. 

पण, 'कहते हैं नसीब वक्त बदल सकता है, इंसान की फितरत नहीं' असं म्हणत सुनीता यांनी नवाजुद्दीनचे सगळे दावे फेटाळून लावलेत. एका फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी 'मी तुला तुझ्या गरीबीमुळे नाही तर तुझ्या गरीब विचारांमुळे सोडलं होतं... तू तुझ्या आत्मचरित्रातून दाखवून दिलंस की मी ज्या नवाजुद्दीनला ओळखत होते त्यापेक्षा तू खूपच गरीब आहेस... तुला महिलांचा आदर करणं ना तेव्हा जमलं ना आत्ता तू काही शिकला... तुम्हारे हालात पर बस इतना ही कहुंगी, जा, तू शिकायत के काबिल होकर आ, अभी तो मेरी हर शिकायत से तेरा क़द बहुत छोटा है' असं सुनीता यांनी म्हटलंय. 


सौ. फेसबुक

  

 


सौ. फेसबुक


सौ. फेसबुक