१२ वर्षापूर्वी सुनील दत्तने लिहिले होते परेश रावलला पत्र

दिग्गज अभिनेता परेश रावल संजय दत्तच्या बायोपिक संजूमध्ये सुनील दत्तची भूमिका साकारत आहेत. 

Updated: May 31, 2018, 04:01 PM IST
१२ वर्षापूर्वी सुनील दत्तने लिहिले होते परेश रावलला पत्र title=

मुंबई : दिग्गज अभिनेता परेश रावल संजय दत्तच्या बायोपिक संजूमध्ये सुनील दत्तची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या मते ही भूमिका त्यांच्याच नशिबात होती. परेश रावलना त्यांच्या जन्मदिवशी एक पत्र मिळाले होते आणि हे पत्र अभिनेता संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी लिहिले होते. परेश रावल म्हणाले, माझे सुनील दत्त यांच्याशी खास संबंध आहेत. २५ मे २००५मध्ये मुंबईमध्ये मी फिल्म दीवाने हुए पागलसाठी काही पॅचवर्क केले होते. मी हॉटेलमध्ये गेलो कारण मी अमेरिकेतून आलो होतो. माझ्या पत्नीने तेव्हा दत्त साहेबांकडून पत्र आल्याचे सांगितले तेव्हा मी तिला विचारले कोणाचे? ती म्हणाली सुनील दत्त साहेब.

परेश रावल तिला म्हणाले, ते मला काय पत्र लिहिणार. तर तिने सांगितले, त्यांनी तुमच्या वाढदिवसासाठी पत्र लिहिलेय. मात्र माझा वाढदिवस ३० मेला आहे. तर ते पाच दिवस आधीच पत्र का लिहितील. 

 

संजू या सिनेमात परेश रावल संजय दत्तच्या वडिलांची भूमिका साकारतायत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.