सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना ऑटो ड्राव्हवरची मारहाण

  कॉमेडी नाइट्स विथ कपिल मध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना एका ऑटो रिक्षा चालकाने भररस्त्यात मारहाण केली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 20, 2017, 08:55 PM IST
सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना ऑटो ड्राव्हवरची मारहाण title=

मुंबई :  कॉमेडी नाइट्स विथ कपिल मध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना एका ऑटो रिक्षा चालकाने भररस्त्यात मारहाण केली. 

अंधेरी येथे हा प्रकार घडला. सुमोनाच्या वडिलांना मारहाण केली तसेच त्याच्या डोक्याला दगडही मारला. त्यामुळे ते जखमी झाले. सध्या त्यांचा हॉस्पीटलमध्ये इलाज सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली होती. 

पण आता त्याला पाच हजाराच्या जामीनावर सोडून देण्यात आले.  मीडियामध्ये आलेल्या बातमीनुसार सुमोनाची आईची तब्येत बिघडली होती. अभिनेत्रीचे वडील तिला घेऊन हॉस्पीटलमध्ये जात होते. त्यावेळी कोणी ऑटो चालक यायला तयार व्हता. शेवटी एक ऑटो चालक तयार झाला. पण तो खूप पैसे मागत होता. 

यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. पण पत्नीची हालत पाहून सुमोनाच्या वडिलांनी जास्त भाडे देऊन जाण्यास तयार झाले. पण वाद इतका वाढला की ऑटो ड्रायव्हरने त्यांच्या डोक्याला दगड मारला. त्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. 

सुमोनाची आई एक व्यक्तीची मदत घेऊन त्यांना कारने हॉस्पिटलला घेऊन गेली. त्या ठिकाणी त्यांचा इलाज सुरू आहे. अभिनेत्री सुमोनाने दिल्या माहितीनुसार यावेळी रस्त्यावर अनेक जण होते पण कोणी मदत केली नाही. 

यानंतर पवई पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली. त्याची ओळख पटली असून २५ वर्षीय अमित गुप्ता असे याने नाव असून त्याला ५ हजारांच्या जामिनावर सोडून देण्यात आले.