एकमेकांच्या मिठीत शाहरुख-गौरी; Suhana Khan च्या पोस्टने वेधलं अनेकांचं लक्ष

'रोमांसचा बादशाहा' शाहरुख खऱ्या आयुष्यातही तितकाच रोमाँटिक; सुहानेने पोस्ट केला शाहरुख-गौरीचा खासगी फोटो  

Updated: Oct 10, 2022, 10:26 AM IST
एकमेकांच्या मिठीत शाहरुख-गौरी; Suhana Khan च्या पोस्टने वेधलं अनेकांचं लक्ष  title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि जिद्दीने बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शाहरुखच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल कायम चर्चा रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, शाहरुख आणि गौरीची (gauri khan) लव्हस्टोरी देखील किंग खानच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे. आज शाहरुख आणि गौरी त्यांच्या तीन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. नुकताच गौरीने मोठ्या थाटात वाढदिवस साजरा केला. (gauri khan and shahrukh khan lovestory)

गौरीने यंदाच्या वर्षी वयाच्या 52 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यामुळे आईला खास शुभेच्छा देण्यासाठी सुहाना खानने आई-वडिलांचा एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सध्या सुहानाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  (Happy Birthday Gauri)

सुहानाने वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर आई गौरीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहे. सुहानाने तिच्या आई-वडिलांचा एक रोमँटिक फोटो शेअर करून चाहत्यांना एक मोठी ट्रीटही दिली आहे. यामध्ये शाहरुख आणि गौरी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. ( suhana khan viral video)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर (Suhana Khan social media) तुफान व्हायरल होत आहे. शाहरुखचं पहिलं आणि शेवटचं प्रेम म्हणजे गौरी. आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक म्हणजे गौरी आणि शाहरुख. करियरच्या उच्च शिखरावर पोहोचलेलं खान कुटुंबाच्या मुलांनी देखील त्यांच्या करियरची सुरुवात केली आहे.  (suhana khan and gauri khan)

सुहाने खानने 'द आर्चिस' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर दुसरीकडे आर्यन खान (Aryan Khan) लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच आर्यनने एक वेब सीरिजमध्ये लेखक म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. ( suhana khan boyfriend)