Sanjay Datt च्या नावाचं सिंदूर लावतात रेखा? नक्की काय आहे प्रकरण

अमिताभ बच्चन, राज बब्बर नाही  तर, संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा? आज सर्वकाही असूनही राहतात एकट्या   

Updated: Oct 10, 2022, 09:35 AM IST
Sanjay Datt च्या नावाचं सिंदूर लावतात रेखा? नक्की काय आहे प्रकरण  title=

Happy Birthday Rekha : 'प्रेम की आग दोनो तरफ लगी हो तो जलती रहती हैं, वरना बुझ जाती हैं...' असे अनेक प्रेमावर आधारलेले अभिनेत्री रेखा (Rekha) यांचे डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाले. रेखा यांच्या अदा, अभिनय, डान्स, सौंदर्यावर आजही चाहते फिदा आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या नवाची चर्चा होती. रेखा यांचं प्रोफेशनल आयुष्य फार ग्रेट होतं, पण खासगी आयुष्यात मात्र अनेकांनी त्यांची अर्ध्यावर साथ सोडली. (Rekha personal life)

रेखा आणि महानायक अमिकाभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. पण बिग बी रेखा यांची शेवटपर्यंत साथ देवू शकले नाही. कारण जेव्हा रेखा आणि बिग बी यांच्या प्रेमाचा गुलाब बहरला तेव्हा महानायक विवाहीत होते. 

अमिताभ आणि रेखा यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर रेखा यांचं नाव राज बब्बर (Raj Babbar) यांच्यासोबत जोडण्यात आलं. पण हे नातं देखील लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. रेखाच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्यानंतर रेखा कोणाच्या नावाचं सिंदूर लावतात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.  (sanjay dutt rekha affair)

याप्रश्नावर रेखा म्हणाल्या, 'मी कोणाच्याही नावाने सिंदूर लावत नाही. माझं फॅशन म्हणून मी सिंदूर लावते. माझ्या मेकवर सिंदूर उठून दिसतो म्हणून मी सिंदूर लावते.' पण त्यानंतर रेखा अभिनेता संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात अशी चर्चा देखील रंगली होती. (rekha sanjay dutt vermillion)

अशी देखील चर्चा आहे की, रेखा अभिनेता संजय दत्तच्या प्रेमात होत्या, म्हणून त्या संजूबाबाच्या नावाचं सिंदूर लावायच्या. पण ही गोष्ट कितपत खरी आहे, हे सांगणे कठिण आहे.  (rekha and sanjay dutt dating)