या 'शो'चे दाखवले जाणार अनसीन फुटेज

‘स्टुपिड मॅन स्मार्ट फोन’ हा एक सर्व्हायवल शो गाजला होता. केवळ एका स्मार्टफोनच्या आधारावर कुठल्या तरी जंगलात दिवस काढणे असा हा शो होता. 

Updated: Oct 7, 2017, 05:43 PM IST
या 'शो'चे दाखवले जाणार अनसीन फुटेज  title=

मुंबई : आजकालच्या स्मार्ट जगात सर्वाना झटपट आणि स्मार्ट काम करण्याची सवय लागलेली आहे . तरुण वर्ग तर स्मार्टफोनशिवाय तर राहूच शकत नाही . पण ह्याच स्मार्टफोनच्या साहाय्याने आपल्याला एखाद्या ठिकाणी राहाव लागलं तर .

वायकॉम १८ चे वूट वर  "स्टुपिड मॅन स्मार्ट फोन " हा आपला पहिला सर्व्हायवल शो ची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. ह्या शो चे दुसरे पर्व राजस्थान मध्ये शूट झालेले असून कॉमेडियन सुमित व्यास हे असणार आहेत , तसेच त्यांच्यासोबत युट्युबर साहिल खट्टर सुद्धा असणार आहे . 

काही महिन्यांपूर्वी बीबीसी चॅनेलवर ‘स्टुपिड मॅन स्मार्ट फोन’ हा एक सर्व्हायवल शो गाजला होता. केवळ एका स्मार्टफोनच्या आधारावर कुठल्या तरी जंगलात दिवस काढणे असा हा शो होता. 

"स्टुपिड मॅन स्मार्ट फोन " शोच्या इंडियन व्हर्जनचे चित्रीकरण ‘बीबीसी वर्ल्डवाइड प्रॉडक्शन’ आणि ‘वूट’ एकत्रितपणे याच शूट पूर्ण होऊन आता ‘वूट’ च्या अँप वर लॉन्च झालेल आहे . 

सुमित आणि साहिल ह्या दोघांनी राजस्थानच्या वाळवंटातही काय काय धमाल केली आणि शूट दरम्यान ह्या दोघांना कोणकोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं हे अनसीन फुटेज ‘वूट’ आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहेत .