Bollywood चे स्टार कीड्स प्रेम रंगी रंगले! नव्या वर्षात पाहा कोणी कोणी धरलीये प्रेमाची साथ?

Bollywood Star Kids Who are fallen in Love: बॉलिवूडमध्ये सध्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहे त्यामुळे सध्याच्या आघाडी स्टारकीड्सच्या डेटिंग लिस्टची चर्चा आहे. 

Updated: Jan 6, 2023, 06:51 PM IST
Bollywood चे स्टार कीड्स प्रेम रंगी रंगले! नव्या वर्षात पाहा कोणी कोणी धरलीये प्रेमाची साथ? title=

Bollywood Star Kids Who are fallen in Love: सध्या बॉलिवूडच्या सुपरस्टारचे स्टारकीड्स (Bollywood Starkids) हे आता लहान राहिलेले नाहीत तर मोठे झाले आहेत. आमिर खानच्या (Amir Khan Daughter) लेकीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. तिच्या साखरपुड्याचे (Amir Khan Engagement) फोटोही सगळीकडे व्हायरल झाले होते. फक्त आयरा खानचं नाही तर बॉलिवूडचे अनेक स्टारकीड्सही आता प्रेमात पडू लागले आहेत. यामध्ये जान्हवी कपूर, सुहाना खान, आर्यन खान, सारा अली खान, अगस्त्या नंदा अशी काही आघाडीच्या स्टार कीड्सची नावं आहेत. सध्या हे स्टारकीड्स कुठे ना कुठेतरी स्पॉट होताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यासोबत स्पॉट होणाऱ्या इतर स्टारकीड्सचीही मग चर्चा होऊ लागते. सध्या अशाच काही स्टारकीड्सची (Star Kids Love Affair) चर्चा आहे तेही प्रेमात पडले आहे की काय, अशी सगळीकडूनच शंका व्यक्त होत आहे. चला पाहूया नक्की काय स्टार कीड्सची डेटिंग लिस्ट काय सांगते? (star kids who has fallen in love this year see who are their rumours partners)

सध्या असे अनेक स्टारकीड्स आहेत ज्यांची सगळीकडेच चर्चा आहे. ही चर्चा त्यांच्या बॉलिवूड डेब्यूची नाही तर त्यांच्या लव्ह अफेअरची आहे. हे बॉलिवूड स्टार कीड्स बॉलिवूडमध्ये डेब्यू (Bollywood Star Kids Debut) करण्याच्या आतच चर्चेत आले आहेत. सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती सुहाना खानची (Suhana Khan). समोर आलेल्या माहितीनुसार, सुहाना खान बॉलिवूडचे शहेनशहा अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नातवाला अगस्त्या नंदाला (Agastya Nanda) डेट करत आहे. हे दोघं एकमेकांना गेल्या वर्षाभरापासून डेट करत आहेत. ते दोघंही लवकरच झोया अख्तर हिच्या 'द आर्चिज' या चित्रपटातून दिसणार आहेत. हा त्यांच्या पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. असं कळते की येत्या ख्रिसमसमध्ये सुहाना अगस्त्याच्या घरांच्यानाही भेटली होती. 

त्याचबरोबर सध्या दुसरी चर्चा आहे ती जान्हवी कपूरची (Janhavi Kapoor). जान्हवी कपूर ही बिझनेसमनच्या मुलाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. शिखर पाहाडियासोबत ती अनेकादा एकत्र पार्ट्यांमध्ये दिसली आहे. सध्या ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं आहेत. 

सारा अली खानच्या (Sara Ali Khan) लव्ह अफेअरच्या कायमच चर्चा होत राहिल्या आहेत. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना कोण उधाण आलं होतं सध्या ते दोघं एकमेकांपासून वेगळे असून कार्तिक आर्यन आणि सारा अली खान दुसऱ्याच कोणाला तरी डेट करत असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत परंतु अद्याप यावर कोणतीही ठोस माहिती नाही. 

सध्या अजून एका स्टार कीडची चर्चा आहे आणि ती व्यक्ती म्हणजे शाहरूख खानचा लेक आर्यन खान (Aryan Khan). आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर खूपच जास्त चर्चेत आला होता. सध्या तो आणि नोरा फतेही एका पार्टीत एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे त्या दोघांच्या चर्चांना उधाण आले होते सध्यातरी ही अफवा असल्याचं बोललं जातं आहे.