‘बाहुबली’ साकारणाऱ्या S.S. Rajamouli चं विवाहित महिलेवर प्रेम; प्रपोज केल्यानंतर जे झालं ते.....

नात्यात असं वळण आलं की... 

Updated: Oct 11, 2021, 09:37 AM IST
‘बाहुबली’ साकारणाऱ्या S.S. Rajamouli चं विवाहित महिलेवर प्रेम; प्रपोज केल्यानंतर जे झालं ते.....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : ‘मगधीरा’, ‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ असे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते एस.एस. राजामौली यांनी कायमच चाहत्यांना त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून थक्क केलं आहे. त्यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. कारण कलाकृतींच्या माध्यमातून राजामौली यांनी आपला ठसा चाहत्यांच्या मनावर उमटवला आहे.

रुपेरी पडद्यावर राजामौली जितके लार्जर दॅन लाईफ चित्रपट उभे करतात, तितकंच त्यांचं खरं आयुष्यही त्याच पठडीत बसेल असं रंजक आहे. राजामौली यांनी त्यांचं खासगी आयुष्य कायमच गुलदस्त्यात ठेवलं आहे. राजामौली यांच्या पत्नीचं नाव रमा. लोकप्रिय सेलिब्रिटी कुटुंबात रमा यांचा जन्म झाला. राजामौली यांच्याशी विवाहबंधनात अडकण्यापूर्वी रमा या विवाहित होत्या. पण, खासगी जीवनात आलेल्या वादळामुळं त्या या नात्यातून वेगळ्या झाल्या होत्या.

रमा , या त्यांच्या पतीपेक्षा म्हणजेच एस.एस.राजामौलींपैक्षा वयानं 4 वर्षे मोठ्या आहेत. असं म्हटलं जातं की, राजामौली पहिल्यांदाच रमा यांना भेटले त्यावेळी त्या विवाहित आणि एका मुलाची आई होत्या. त्यांची प्रेमकहाणीही कोणा एका चित्रपटाहून कमी नाही. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एम.एम. कीरावनी यांच्या पत्नी श्रीवल्ली यांची रमा धाकटी बहीण. एक काळ असा होता जेव्हा रमाच्या वैवाहिक नात्यात भयंकर तणाव होता. त्याचवेळी तिनं पहिल्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता.

ss rajamouli family

ss rajamouli with his wife

दरम्यानच्या तणावाच्या काळात राजामौलींनी रमाला साथ दिली होती. 2001 मध्ये अखेर त्यांनी रमावर असणारं प्रेम व्यक्त केलं आणि मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. नात्यात आलेल्या या वळणानंतर त्याच वर्षी अखेर या दोघांनी कोर्ट मॅरेज पद्धतीनं लग्न करत वैवाहिक आयुष्याचा एक नवा अध्याय सुरु केला.