Good News : बॉलिवूडमध्ये आणखी एक कपल; खास अंदाजात अभिनेत्रीकडून प्रेमाची कबुली

 पाहा ही नवी जोडी आहे तरी कोण...

Updated: Oct 11, 2021, 08:33 AM IST
Good News : बॉलिवूडमध्ये आणखी एक कपल; खास अंदाजात अभिनेत्रीकडून प्रेमाची कबुली  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो, असं म्हणत अखेर हिंदी चित्रपट जगतामध्ये आणखी एका प्रेमी युगुलाने अर्थात आणखी एका सेलिब्रिटी कपलने त्यांच्या प्रेमाची ग्वाही दिली आहे. नात्याची कबुली देताना सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनीही एक सुरेख फोटो पोस्ट केला.

आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी प्रेमाच्या व्यक्तीसाठी ही सुरेख पोस्ट लिहिणारी अभिनेत्री आहे रकुलप्रीत सिंग. रकुलनं वाढदिवसाच्याच दिवशी निर्माता, अभिनेता जॅकी भगनानी याच्यासोबतच्या नात्याचा जाहीर स्वीकार केला.

‘थँक्यू... तू मला यंदाच्या वर्षी भेटलेलं सर्वात मोठं गिफ्ट आहेस. माझ्या जीवनात रंगांची उधळण करण्यासाठी धन्यवाद. मला अविरस आनंद देण्यासाठी धन्यवाद, तू जसा आहेस त्या अस्तित्वासाठी धन्यवाद. एकत्र आणखी आठवणी एकवटूया जॅकी...’, असं कॅप्शन तिने या पोस्टमध्ये लिहिलं.

जॅकीसोबत चालत जाताना त्याचा हात धरून असणारा एक पाठमोरा फोटो रकुलनं शेअर केला. तिच्या या पोस्टवर बी टाऊमधील अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली.

आयुष्मान खुराना, काजल अग्रवाल, राशी खन्ना, सोफी चौधरी या आणि इतरही सेलिब्रिटींनी तिच्या या पोस्टवर कमेंट केल्या. रकुलमागोमागच जॅकीनंही ही पोस्ट शेअर केली. ‘तुझ्याशिवाय हा दिवस शून्य वाटतो. तुझ्याशिवाय चविष्ठ जेवणालाही चव नसते. सर्वात सुंदर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. तू माझं विश्व आहेस. देव करो तुला हा दिवस तुझ्या हसण्याइतकाच सुंदर जावो... ’, असं त्यानं या कॅप्शनमध्ये लिहिलं.

जॅकी आणि रकुलच्या नात्याची ग्वाही सध्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणून गेली आहे. इतकंच नव्हे तर या सेलिब्रिटी जोडीनं नात्याबाबतची माहिती देताच चाहत्यांनी थेट त्यांच्या लग्नाची तारीखही विचारली. तेव्हा आता या प्रश्नाचं उत्तर हे दोघं कधी देणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.