रश्मिका मंदान्नाला छोटा ड्रेस घालणं पडलं महागात; अभिनेत्री Oops Moment ची शिकार

साऊथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी रश्मिका मंदान्ना नुकतीच एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती.

Updated: Jul 16, 2022, 03:34 PM IST
रश्मिका मंदान्नाला छोटा ड्रेस घालणं पडलं महागात; अभिनेत्री Oops Moment ची शिकार title=

मुंबई : साऊथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी रश्मिका मंदान्ना नुकतीच एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली होती. या दरम्यान तिने असे कपडे घातले होते की, तिला पुन्हा पुन्हा संभाळून चालावं  लागत होतं.

यावेळी रश्मिकाने खूप छोटा ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच अस्वस्थ दिसत होती. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून लोकांनी तिला ट्रोलही करायला सुरुवात केली. यावेळी तिला युजर्स म्हणताना दिसले की,  जर ती या आउटफिटमध्ये इतकी अस्वस्थ होती तर मग तिने असे कपडे का घातले?  रश्मिका ओप्स मोमेंटची शिकार होण्याची ही काही तिची पहिलीच वेळ नाही.

रश्मिकाचा बोल्ड आउटफिट
रश्मिका मंदान्ना नुकतीच एका अवॉर्ड शोमध्ये पोहोचली. प्रत्येक वेळी प्रमाणेच रश्मिका खूपच हॉट दिसत होती. अवॉर्ड शोमध्ये रश्मिकाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसचा एक भाग खूप लांब होता. रश्मिकाला या आउटफिटमध्ये चालणं कठीण जात होतं. या व्हिडिओत एका ती बेंचवर बसलेली दिसत आहे आणि या दरम्यान तिने तिचा छोटासा ड्रेस तिच्या ड्रेसच्या लांब भागाने झाकून घेतला आहे. जेणेकरून तिला ऊप्स मोमेंटला बळी पडावं लागू नये.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थ मल्होत्रासोबत करणार डेब्यू
रश्मिका मंदान्ना सिद्धार्थ मल्होत्रासोबत हिंदीत पदार्पण करणार आहे. मिशन मजनू असं तिच्या चित्रपटाचं नाव असून त्यात सिद्धार्थ एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी सिद्धार्थला त्याच्या शेरशाहमधील भूमिकेला खूप पसंती मिळाली होती. मिशन मजनू व्यतिरिक्त रश्मिका रणबीर कपूरसोबत एनिमल सिनेमात दिसणार आहे. दोघंही गेल्या महिन्यात शूटिंगसाठी हिमाचलमधील मनालीला पोहोचले होते. जिथून त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.