Alia Bhatt च्या प्रेग्नेंसीबद्दल सेलिब्रिटी ज्योतिषाची भविष्यवाणी ठरेल खरी?

सेलिब्रिटी ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर आलिया भट्ट...   

Updated: Jul 16, 2022, 03:31 PM IST
Alia Bhatt च्या प्रेग्नेंसीबद्दल सेलिब्रिटी ज्योतिषाची भविष्यवाणी ठरेल खरी? title=

मुंबई : अभिनेता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे नाही, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आलियावर इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताचं फक्त चाहत्यांनीचं नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या. सध्या आलिया-रणबीरच्या येणाऱ्या बाळाची चर्चा तुफान रंगत आहे. 

रिपोर्टनुसार आलिया जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याची चर्चा रंगत आहे. सेलिब्रिटी ज्योतिषाने केलेल्या भविष्यवाणीनुसार आलिया जुळ्या मुलांना जन्म देऊ शकते. सोशल मीडियावर देखील अशा चर्चांनी जोर धरला आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

दरम्यान, 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड सिनेमाच शुटिंग पूर्ण करून आलिया युरोपमधून भारतात परतली आहे. यादरम्यान ती एअरपोर्टवर बेबी बंपसोबत स्पॉट झाली होती. तेव्हा आलिया घेण्यासाठी रणबीर एअरपोर्टवर आला होता.

दोघांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायच झाल तर, आलिया आणि रणबीर 'ब्रह्मास्त्र'मधून पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

याशिवाय रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा सिनेमाही 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये रणबीर संजय दत्त आणि अभिनेत्री वाणी कपूरसोबत झळकणार आहे.