बोनी कपूरच्या आईने श्रीदेवींच्या पोटात लाथा मारल्या होत्या - रामूंची धक्कादायक माहिती

अभिनेत्री श्रीदेवीच्या दुबईतील मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. 

Updated: Feb 27, 2018, 05:16 PM IST
बोनी कपूरच्या आईने श्रीदेवींच्या पोटात लाथा मारल्या होत्या - रामूंची धक्कादायक माहिती  title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीच्या दुबईतील मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. 

आता बोनी कपूरला क्लिनचीट देऊन श्रीदेवींचा मृतदेह कपूर कुटुंबीयांच्या हातात सोपावण्यात आला आहे. 
श्रीदेवींच्या अकाली जाण्याने तिच्या चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्सही हळहळले आहेत. दरम्यान दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी श्रीदेवींच्या आयुष्यातील काही घटनांबाबत सोशल मीडियावर ओपन लेटर लिहले आहे.  

काय म्हणाले राम गोपाल वर्मा ? 

राम वर्मा गोपाल यांनी बोनी कपूरच्या आईने श्रीदेवींचा छळ केल्याचे तसेच काही धक्कादायक माहितीबाबत खुलासा केला आहे. त्यानुसार एकदा पंचतारांकित हॉटेलमध्ये बोनी कपूरच्या आईने श्रीदेवींना हॉटेलमध्ये सार्‍यांसमोर मारहाण केल्याची माहिती राम गोपाल वर्मा यांनी ओपन लेटरमध्ये लिहली आहे.  तसेच श्रीदेवींचा उल्लेख  ' घर मोडणारी स्त्री' असा केला होता.  

 

श्रीदेवी नाखुश होत्या - राम गोपाल वर्मा 

'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटाचा काही भाग वगळता श्रीदेवी या इतर प्रोजेक्ट्सच्या वेळेस नाखूश होत्या. भविष्याबाबतची अनिश्चितता, वैयक्तिक आयुष्यातील चढउतार यामुळे श्रीदेवी सतत चिंतेत होत्या. 

श्रीदेवींना शांती मिळो 

एरवी कोणाचा मृत्यू झाल्यास मी शांती मिळो असे म्हणत नाही पण श्रीदेवी या महिलेच्या रूपात पण अनेक गोष्टींमध्ये अडकलेल्या लहान मुलाप्रमाणे होत्या. आता मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे.