श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी आला 'हा' नेत्रहीन

बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं निधन साऱ्यांनाच चटका लावून जाणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 28, 2018, 10:35 AM IST
श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी आला 'हा' नेत्रहीन  title=

मुंबई : बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं निधन साऱ्यांनाच चटका लावून जाणार आहे. 

बॉलिवूड जगता बरोबरच तिच्या चाहत्यांकरता देखील हा खूप मोठा धक्का होता. श्रीदेवींचे चाहते हे मानतच नाही की त्यांचा मृत्यू झाला आहे. आणि आता यापुढे श्रीदेवी आपल्याला पाहायला मिळणार नाही. अशावेळी श्रीदेवीचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उत्तर प्रदेशहून चाहता आला आहे. जो त्यांनी शेवटची झलक पाहण्यासाठी आतुर आहे. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की हा श्रीदेवीचा चाहता दृष्टीहीन आहे. 

श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी हा नेत्रदीन उपस्थित 

जतिन वाल्मिकी नावाच्या या व्यक्तीची ओळख श्रीदेवीशी एका कार्यक्रमा दरम्यान झाली होती. यावेळी जतिन यांनी श्रीदेवीला आपल्या भावाला ब्रेन ट्यूमर झालं असल्याचं सांगितलं आहे. आणि अगदी क्षणाचाही विलंब न करता श्रीदेवीने जतीनला 1 लाख रुपये दिले. तसेच उपचाराकरता हॉस्पिटलमध्ये देखील 1 लाख रुपये पाठवून दिले. जतिनने सांगितलं की, आता मी त्याच अभिनेत्रीच्या सन्मानासाठी आलो आहे. ज्यांच्यामुळे आज माझा भाऊ जिवंत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मला माहित आहे की, त्यांनी दिलेले पैसे मी कधीच पुन्हा करू शकत नाही. मात्र त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन मी त्यांचा सन्मान करू शकतो. ज्या दिवशी मला श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हाच मी त्यांच्या दर्शनासाठी येण्याचा निर्णय घेतला होता.