श्रीदेवीचे पार्थिव पाहून सलमानला अश्रू अनावर

बॉलीवूडची रुप की रानी श्रीदेवीवर आज मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलेय. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Feb 28, 2018, 10:06 AM IST
श्रीदेवीचे पार्थिव पाहून सलमानला अश्रू अनावर title=

मुंबई : बॉलीवूडची रुप की रानी श्रीदेवीवर आज मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलेय. 

12.30 वाजता श्रीदेवीला अखेरचा निरोप देण्यात येईल. त्यानंतर 3.30 वाजता एस.व्ही रोडस्थित विलेपार्ले वेस्ट सेवा समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

याआधी मंगळवारी रात्री श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत दाखल झाले. यावेळी अनेक सेलिब्रेटी कपूर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पोहोतले होते. यावेळी सलमानही तेथे होता. श्रीदेवींचे पार्थिव पाहून सलमानला जागीच रडू कोसळले. 

श्रीदेवीच्या अचानक जाण्याने साऱ्यांना धक्का बसलाय. अद्यापही श्रीदेवी आपल्यातच आहेत असे अनेकांना वाटतेय. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता बोनी आणि अर्जुनसह कपूर कुटुंबातील अन्य सदस्य श्रीदेवीचे पार्थिव घेऊन मुंबईत पोहोचले. 

श्रीदेवीचे पार्थिव अनिल अंबानीच्या प्रायव्हेट जेटमधून आणण्यात आले. यावेळी श्रीदेवीचे पार्थिव आणण्यासाठी अभिनेता अनिल कपूर एअरपोर्टवर होते. तसेच चाहत्यांची मोठी गर्दीही एअरपोर्टवर होती.