'चला हवा येऊ द्या'मध्ये श्रीदेवींनी केलेला अखेरचा डान्स

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2018, 03:49 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये श्रीदेवींनी केलेला अखेरचा डान्स title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं.

अचानक एक्झिट

श्रीदेवी आपल्या कुटुंबियांसोबत एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वीच चला हवा येऊ द्या च्या मंचावर बॉलिवुडची हवा हवाई गर्ल अवतरली होती. या कार्यक्रमासाठी श्रीदेवी खास मराठमोळ्या अवतरात म्हणजे नववारी साडीत आल्या होत्या. 

चला हवा येऊ द्यामध्ये डान्स

लग्नानंतर काही काळ अभिनयापासून दूर गेलेल्या श्रीदेवीने इंग्लीश विंग्लीश चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं होतं आणि त्यानंतर मॉम चित्रपटातून त्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.