श्रीदेवीच्या निधनाची बातमी कळताच बोनी कपूर असे झाले रिअॅक्ट

  श्रीदेवीच्या अकाली मृत्युमुळे सारेचजण धक्क्यात आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 26, 2018, 08:01 PM IST
श्रीदेवीच्या निधनाची बातमी कळताच बोनी कपूर असे झाले रिअॅक्ट  title=

मुंबई :  श्रीदेवीच्या अकाली मृत्युमुळे सारेचजण धक्क्यात आहे. 

कपूर कुटुंबावर हा खूप मोठा आघात आहे. बोनी कपूर यांच्यासाठी श्रीदेवीचं असं अचानक जाण खूप धक्कादायक होतं. शेवटच्या क्षणी श्रीदेवीसोबत बोनी कपूरच होते. बोनी कपूर हे श्रीदेवीसोबत दुबईतील एका हॉटेलमध्ये जेवायला जाणार होते. त्याच्या काही वेळापूर्वीच श्रीदेवी बाथरूममध्ये पडलेल्या सापडल्या. आणि काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने बोनी कपूर यांच्यावर खूप मोठा आघात झाला आहे. 

नेमकं काय झालं? 

श्रीदेवींना सरप्राईज देण्यासाठी बोनी कपूर शनिवारीच मुंबईहून दुबईला गेले होते. बोनी दुबईला पोहोचताच थेट श्रीदेवी थांबलेल्या हॉटेलात गेले. त्यांनी श्रीदेवींना उठवले. दोघांनीही पंधरा मिनिटे गप्पा केल्यात. यानंतर डिनरला जायचे म्हणून श्रीदेवी फ्रेश व्हायला बाथरूमध्ये गेल्या. पण १५ मिनिटे होऊनही त्या बाहेर आल्या नाहीत. बोनी यांनी दार ठोठावले. पण आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी श्रीदेवी बाथटबमध्ये   बेशुद्धावस्थेत आढळल्या. बोनी यांनी सर्वप्रथम त्यांना शुद्धीत आणण्यात प्रयत्न केलेत. यानंतर त्यांना त्वरित रूग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बोनी कपूर यांना श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी कळताच 

श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी ऐकताच बोनी कपूर हमसून हमसून रडू लागले. अवघ्या काही तासांत होत्याच नव्हत झालं. श्रीदेवी बोनी कपूर यांची दुसरी पत्नी. आपल्या पत्नीचा असा विरह त्यांना सहन झाला नाही.  ‘मॉम’मध्ये श्रीदेवींच्या पतीची भूमिका साकारणारा पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकीने याबाबत माहिती दिली. अदनान सिद्दीकी त्यावेळी दुबईतच होता. श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी बोनी कपूर यांची भेट घेतली. बोनी कपूर अगदी लहान मुलासारखे रडत होते. श्रीदेवींच्या निधनाने ते पूर्णपणे खचले आहेत. वारंवार श्रीदेवीच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून येत आहे. त्यांची अवस्था अतिशय खराब आहे. यातही कायदेशीर चौकशीला त्यांना सामोरे जावे लागले,असे सिद्दीकी यांनी सांगितले.