मुंबई : दबंग स्टार सलमान खान सद्ध्या 'टायगर जिंदा है' या आपल्या आगामी चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रीकरण यूएई मध्ये करत आहे.
पण या चित्रपटाच्या चित्रीकरणामधून वेळ काढून सलमान एका १५ वर्षीय मुलाच्या फरारीला पाहायला गेला होता. राशेज बेल्हसा या १५ वर्षीय मुलाकडे एक कस्टमाईज फरारी आहे. या फरारीकडे सलमान खान बराच वेळ बघतच राहिला.
राशेज हा १५ वर्षीय मुलगा दुबईमध्ये राहतो. आणि हा इतक्या लहान वयामधील सर्वांत श्रीमंत मुलगा आहे. राशेजचे वडील मुगल सैफ अहमद बेल्हसा हे उद्योगपती आहेत. सलमान दुबईत खास राजेशच्या फरारी पहायला आला आणि ती बराच वेळ न्याहाळून पाहतानाचा व्हिडियो राशेजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रीकरण सद्ध्या अबुधाबीमध्ये सुरू आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमात अनेक दिवसांनी सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी रसिकांसमोर येणार आहे