मुंबई : झगमगत्या दुनियेत कलाकार त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांच्या अफेअर आणि घटस्फोटांमुळे चर्चेत असतात. कलाकारांची आयुष्य पडद्यावर वेगळं असतं पण त्यांच्या खासगी आयुष्यात प्रचंड उतार-चढाव असतात. असेच उतार-चढाव सामान्य माणसांच्या आयुष्यात देखील सुरू असतात. पण कलाकारांचा सर्वात शेवटचा मार्ग म्हणजे ब्रेकअप किंवा घटस्फोट. अशीचं परिस्थिती ओढावली आहे ती म्हणजे एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर .
या अभिनेत्रीचं एक दोन वेळा नाही तर आता तिसऱ्यांदा घटस्फोट होणार आहे. अभिनेत्रीच्या तिसऱ्या पतीचं नाव रोशन सिंग असं आहे. अभिनेत्रीने पती रोशन सिंगकडून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. अभिनेत्रीने पहिलं लग्न 2003 साली फिल्ममेकर राजीव कुमार बिस्वाससोबत केलं. पण 2016 साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर लगेच अभिनेत्रीने दुसरं लग्न 2016 मध्ये मॉडेल कृष्ण व्रजसोबत केलं. पण तिचं दुसरं लग्न देखील जास्त काळ टिकू शकलं नाही. एका वर्षातचं दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 19 एप्रिल 2019 रोजी अभिनेत्रीने रोशन सिंगसोबत केलं. पण आता ती तिसऱ्या पतीकडून देखील घटस्फोट घेणार आहे.
अभिनेत्रीच्या पतीने सांगितलं की...
एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, रोशन त्याच्या पत्नीच्या मित्रांच्या संपर्कात होता. अभिनेत्री मित्रांकडे सतत पतीबद्दल तक्रार करत होती. 'ती तिच्या मित्रांना सांगयची रोशन लठ्ठ आहे. त्यामुळे तो सेक्स करू शकत नाही...' एवढंच नाही तर बंगाली अभिनेत्री श्राबंती (Srabanti Chatterjee) ने पतीवर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.