दीपिका - रणवीरच्या लग्नाची तयारी सुरू...

आईसोबत लग्नाच्या दागिन्यांची शॉपिंग 

दीपिका - रणवीरच्या लग्नाची तयारी सुरू... title=

मुंबई : सोनम कपूर, नेहा धूपिया, हिमेश रेशमिया यांच्या लग्नानंतर आणखी एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. असं म्हटलं जातंय की, रणवीर आणि दीपिकाचं यांच लग्न १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. रणवीर सिंह या लग्नाच्या तयारीकरता दीपिका पदुकोणसोबत मुंबईतील एका ज्वेलरी शॉपमध्ये दिसले होते. यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. 

दीपिका पदुकोण आपल्या आईसोबत या ज्वेलरी शॉपमध्ये गेली असल्याचं सांगण्यात येत आहे. दीपिका पदुकोण तनिष्कची ब्रंड एम्बेसिडर आहे आणि याच दुकानात ती दिसली. त्यामुळे चर्चा दोन्ही बाजूने आहे पण दीपिका रणवीरच्या लग्नासाठी चाहते भरपूर खूष आहेत. 

नोव्हेंबरमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाचा महिना असल्याचं ठरवलं जातं आहे. या लग्नासाठी दोन जागा निश्चित झाल्याच म्हटलं जातं आहे. ज्यामध्ये श्रीलंका आणि स्वित्झरलँड असे दोन देश असल्याचं म्हटलं जातं आहे. दीपिका आणि रणवीर यांना अनेकदा श्रीलंकेत वेळ घालवताना पाहिलं आहे त्यामुळे यांच लग्न श्रीलंकामध्येच होईल अशी चर्चा आहे. 

दीपिका आणि रणवीर अनेकदा वेगवेगळ्या पार्टीत आणि हॉटेलमध्ये दिसले आहेत. दीपिका रणवीर सिंह याच्या फोटोवर MINE असं कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त करते. तर रणवीर देखील आपलं प्रेम व्यक्त करण्यात कोणतीच कसर सोडत नाही.