Bollywood News : श्रीमंत आणि यशाचं शिखर चढण्यासाठी अनेक जण ज्योतिषशास्त्राची मदत घेतात. कलाकारही यासाठी अनेक प्रयोग करताना दिसून येतात. काही जण आपलं नाव बदलतात. तर नावातील काही अक्षर बदलतात. यशाचे हे टोटके नेहमीच यशस्वी होतील याची कोणीच खतरी देऊ शकतं नाही. पण या फोटोमधील कलाकार Parle G खाऊन रात्र घालवायचा आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार आहे. या कलाकाराने आपल्या नावात न्यूमरॉलॉजीनुसार काही छेडछाड केली आणि त्याची किस्मत बदलली. तुम्ही ओळखलं का या चिमुकल्याला? (spend nights eating parle G once had just 18 rupees in bank this boy in photo is now prince of bollywood entertainment news)
हा चिमुकला आता बॉलिवूडमधील राजकुमार आहे. त्याचा अभिनयाने तो चाहत्यांचा मनात राज्य करत आहे. नाही ओळखलं, चला आम्ही सांगतो हा आहे राजकुमार राव (rajkummar rao). या अभिनेत्याने एका मुलाखत स्वत:च सांगितलं होतं की, मुंबईत अनेक रात्री त्यांनी फक्त पार्ले जी बिस्किट खाऊ घालवली आहे. तो पुढे असंही म्हणाला की, त्याचा बँक अकाऊंटमध्ये फक्त 18 रुपये होते. नॉन फिल्मी बॅकग्राउंट असतानाही राजकुमार राव आज बॉलीवूडमधील उंच शिखरावर पोहोचला आहे.
मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये आपले पाय पसरवले. पण न्यूमरोलॉजीनुसार राजकुमारने त्याचा नाव अतिरिक्त M लावला आहे. त्यामुळे त्याला फायदा झाल्याचं अभिनेता सांगतो. राजकुमार राव याने फिल्मी दुनियेत प्रत्येक प्रकारच्या जोनर असलेल्या चित्रपटात काम केलं. सुरुवातीच्या काळात त्याला अनेक कठीण प्रसंगातून जावं लागलं.
स्त्री चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी राजकुमार रावने भयान अनुभवाबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, त्यावेळी चंदेरीमधील शूटिंग लोकेशनवर आजूबाजूच्या लोकांनी हॉन्टेडची माहिती त्यांना दिली होती. यानंतरही क्रूने रात्रीसुद्धा शूटिंग सुरु ठेवली होती. या शूटिंगच्या वेळी एक लाइट बॉय उंच टेकडीवरुन खाली पडला. तो म्हणाला की त्याला असं वाटलं की, कोणी तरी त्याला ओढलत आहे. पण तिथे लोकांना असं काहीच दिसलं नव्हतं. या भूतिया एक्सपीरियंस बद्दल खुद्द राजकुमार याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.