ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खान आणि मुनमुन धमेचाचं खास कनेक्शन

फक्त आर्यन खान नाही तर इतर सेलिब्रिटींसोबत देखील मूनमून धमेचाचे फोटो व्हायरल 

Updated: Oct 5, 2021, 09:51 AM IST
ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खान आणि मुनमुन धमेचाचं खास कनेक्शन  title=

मुंबई  :  बॉलिवूडशी संबंधित नव्या ड्रग्स प्रकरणाचा खुलासा झाला आहे. एनसीबीने अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला आर्यन खानला अटक केली. त्याच्यासोबत अन्य आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबीच्या ताब्यात असणार आहे. ताब्यात घेतलेल्या आठ जणांमध्ये मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha)देखील आहे. आता ही मुनमुन धमेचा नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मूनमून फक्त आर्यनला ओळखत नाही तर इतर सेलिब्रिटींसोबत देखील तिचे फोटो व्हायरल होत असतात. 

मूनमून धामेचा एक मॉडेल आहे. 39 वर्षीय मुनमुनला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता अटक केली. मुनमुन धामेचा मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहेत. ती व्यापारी कुटुंबातून येते. सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणीही मध्य प्रदेशातील त्यांच्या घरात राहत नाही. मूनमून व्यवसायाने मॉडेल आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मूनमून तिच्या मॉडेलिंगचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते. गेल्या वर्षी मूनमूनच्या आईचं निधन झालं आहे. मूनमूनला एक भाऊ आहे. जो दिल्लीत काम करतो. मुनमुनच्या वडिलांचे देखील अनेक वर्षांपूर्वी निधन झाले. मूनमून सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे 10.3 फॉलोअर्स आहेत. 

तिने 22 सप्टेंबर रोजी अखेरची पोस्ट केली. ज्यामध्ये तिने स्वतःचे काही फोटो शेअर केले होते. मोठ्या सेलिब्रिटींसोबत ओळख असून देखील तिला कोणी फॉलो करत नाही. तिच्या पेजवर अनेक सेलिब्रिटींसोबत फोटो आहेत. शिवाय बी-टाऊनच्या अनेक पार्ट्यामध्ये देखील ती दिसते.