बॉलिवूडविषयी Bahubali फेम रम्याचं धक्कादायक वक्तव्य, दाक्षिणात्य कलाकारांना झालंय तरी काय?

राम्याचा आज वाढदिवस आहे.

Updated: Sep 15, 2022, 12:18 PM IST
बॉलिवूडविषयी Bahubali फेम रम्याचं धक्कादायक वक्तव्य, दाक्षिणात्य कलाकारांना झालंय तरी काय? title=

मुंबई :  'बाहुबली' चित्रपटात शिवगामी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन (Ramya Krishnan ) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवगामी म्हणून ओळखली जाणाऱ्या रम्यानं तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं. एवढंच काय तर तिनं बॉलिवूडमध्येही तिचं नशिब आजमावलं होतं. पण तिथे रम्याला फारस यश मिळालं नाही. आज रम्या स्वत: ला तेलुगू स्टार मानते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रम्यानं या विषयी वक्तव्य केलं आहे. 

आणखी वाचा : फॅशन आयकॉन म्हणता म्हणता तोंडावर पडली मलायका; पाहा नेमकं काय घडलं

'बॉलिवूडमध्ये माझा कुठलाच चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही आणि मी तेलुगू चित्रपटात स्टार किंवा मग लोकप्रिय अभिनेत्री होते. पण साऊथ इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करण्याची हिंमत काही झाली नाही. मला सगळं सोडणं सोपं नव्हतं. तुम्हाला कुठल्याही चित्रपटसृष्टीत काम करायचे असले तर तुमच्याकडे यशस्वी चित्रपट हवा. माझ्याकडे यशस्वी हिंदी चित्रपट नव्हता म्हणून मी तेलुगूमध्येच आनंदी होते, असे रम्या PTI ला म्हणाली. 

आणखी वाचा : मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा 'तो' Topless फोटो पुन्हा व्हायरल!

राम्यानं नुकताच प्रदर्शित झालेल्या लायगर या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडाच्या आईची भूमिका साकारली. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. राम्यानं या आधी 'दयावान', 'परंपरा', 'खलनायक', 'चाहत', 'बनारसी बाबू' आणि 'बड़े मियां छोटे मियां' या हिंदी चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटातील राम्याच्या अभिनयाचं कौतुक झालं पण तिला मुख्य भूमिका मिळाली नव्हती. 

Bas Bai Bas : 'मी हार्ट ब्रोकन झाले...', सई ताम्हणकरचं वक्तव्य चर्चेत

रम्या लवकरच रजनीकांतबरोबर 'जेलर' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'क्वीन' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही राम्या आहे. रम्याची भूमिका ही जयललिता यांच्यावर आधारित आहे. रम्यानं वयाच्या 14 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करते. 1984 मध्ये रम्याचा वेल्लई मनासू हातिचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.