मुंबईः दक्षिण भारतातील ज्येष्ठ गायिका संगीता साजिथ यांचे दुःखद निधन झाले. त्या 46 वर्षांच्या होत्या. संगीता यांचं 22 मे रोजी तिरुअनंतपुरम इथं बहिणीच्या घरी निधन झाले. त्या किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचारही सुरू होते.
संगीता यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी थायकॉड, तिरुअनंतपुरम येथील शांतीकवदम सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीता साजिथ यांनी मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलुगु सिनेमात अनेक गाणी गायली आहेत.
त्यांनी अलीकडेच पृथ्वीराज स्टारर कुरुथीचे थीम साँग गायलं होतं. खरंतर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये 200 हून अधिक गाणी गायली आहेत.
त्यांच्या काही लोकप्रिय गाण्यांमध्ये थन्नेरई कथालिक्कम यांचा समावेश आहे. एआर रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गाण्यांचाही समावेश आहे.
संगीता यांनी तामिळनाडू सरकारच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासमोर ज्ञानपाठात पिझिंथ हे गाणे गायले होतं.