South Indian Actresses: ग्लॅमरस अभिनेत्रीच्या ग्रामीण लूकवर चाहते फिदा! 'त्या' फोटोला 17 लाख Likes; Videos ही चर्चेत

South Indian Actresses Raw Look: सेलिब्रिटींचे नखरे आणि त्यांच्याकडून चाहत्यांना दिली जाणारी वागणूक ही कायमच चर्चेत असते. अनेकदा यावरुन बॉलीवूडमधील कलाकार आणि दाक्षिणात्य कलाकारांची तुलना होताना दिसते.

Updated: Mar 30, 2023, 07:44 PM IST
South Indian Actresses: ग्लॅमरस अभिनेत्रीच्या ग्रामीण लूकवर चाहते फिदा! 'त्या' फोटोला 17 लाख Likes; Videos ही चर्चेत title=
South Indian Actresses Raw Look

South Indian Actresses Raw Look: सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांचे नखरे आणि ट्रॅण्टरम्स हे ओघाने आलेच. पे थ्रीवर अनेकदा या गोष्टींबद्दलच्या बातम्या आणि चर्चा वाचायला मिळतात. सोशल मीडियावरही चाहत्यांना सेलिब्रिटींनी दिलेली चुकीची वागणूक, त्यांनी चित्रपटांच्या शुटींगदरम्यान केलेल्या मागण्या यासंदर्भातील किस्से आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपेक्षा फारच वेगळे असतात आणि त्यांचे इतके नखरेही नसतात असं म्हटलं जातं. दोन्ही कलाकारांची तुलना करणारे अनेक व्हिडीओ आणि किस्सेही सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे फोटो आणि व्हिडीओ आहेत दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशचा (Keerthy Suresh)

साधेपणासाठी ओळखली जाते

कीर्ती सुरेश ही तिच्या साधेपणासाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये प्रसिद्ध आहे. अगदी विमानतळावर चाहत्यांना भेटण्यापासून ते सणासुदी साजरी करण्यापर्यंतच्या कीर्तीच्या अनेक गोष्टी तिचा वेगळेपणा दाखवतात. तिच्या याच साधेपणाचे अनेक चाहते आहेत. असाच एक व्हिडीओ तिने नुकताच पोस्ट केला होता. तशी कीर्ती ही सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. नुकताच तिने सेटवरील एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या साध्या साडीमध्ये अगदी ग्रामीण बाईच्या लूकमध्ये दिसत आहे. पायामध्ये साध्या स्लीपर्स घालून डोक्यावर पदर घेऊन हातात मिर्ची घेत शिड्यांवरुन तिने या फोटोसाठी पोज दिल्याचं दिसत आहे. या फोटोला सोशल मीडियावर 17 लाख 23 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत हे ही विशेषच.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Keerthy Suresh (@keerthysureshofficial)

ग्रामीण लूक व्हायरल

शुटींगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ ती अनेकदा चाहत्यांबरोबर शेअर करते. असाच एक व्हिडीओ तिने ग्रामीण भागामधून शेअऱ केला आहे. यामध्ये ती जनावरांबरोबर दिसत आहे. ती म्हशीला, बकऱ्यांना खायला घालताना दिसत आहे. तसेच ग्रामीण भागातील जीवनाचा ती आनंद घेताना दिसत आहे. तिचा हाच साधेपणा पाहून सोशल मीडियावर तिच्या साधेपणाची चर्चा सुरु झाली आहे. 

कीर्ती सुरेश आणि सुपरस्टार नानीचा 'दसारा' हा चित्रपट उद्या म्हणजेच 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 

कीर्ती सुरेशचे इन्स्टाग्रामर जवळजवळ दीड कोटी फॉलोअर्स आहेत. तिच्या अनेक पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स असतात.