'या' अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी तब्बल २०० सुरक्षारक्षक!

सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध हे समीकरण अनेक वर्षांपासूनच.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 11, 2017, 09:15 AM IST
'या' अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी तब्बल २०० सुरक्षारक्षक! title=

मुंबई : सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध हे समीकरण अनेक वर्षांपासूनच. हे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यांचा प्रभाव इतका असतो की, त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासंतास वाट पाहतात. असेच एका दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्रीसोबत झाले असल्याने तिच्या सुरक्षेसाठी एक-दोन नव्हे तर तब्बल २०० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नयनतारा. 

सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘वेलइक्करन’ या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग राजस्थान, अजमेर आणि किशनगढ येथे सुरू आहे. येत्या २२ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नयनताराची एक झलक पाहता यावी म्हणून तिचे चाहते सेटवर तासन् तास येऊन थांबायचे. ती येणार आहे असे कळताच तिच्या नावाचा एकच जल्लोष करायचे. म्हणूनच तिच्या सुरक्षेसाठी २०० सुरक्षारक्षकांचा खटाटोप करावा लागला. 

नयनतारा शाळेत असल्यापासून मॉडेलिंग करते. २००३ मध्ये ‘मनास्सीनाकरे’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने सातत्याने अनेक हिट चित्रपट दिले.