नवी दिल्ली : साडे सात फूट उंच दलीप सिंह राणा म्हणजे 'द ग्रेट खली'चा एक वेगळा अंदाज आहे. जालंधरमध्ये त्याची स्वतःची कुस्ती अकॅडमी आहे.
अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सोनू सूद खलीच्या रेसलिंग अकॅडमीमध्ये पोहोचला होता. सोनूने पहेलवानांकडून प्रशिक्षणाबद्दल माहिती घेतली. सोनूने खली आणि त्याच्या पहेलवानांबरोबर खूप वेळ घालवला.
सोनूने म्हटलं की, तो चित्रपट निर्मितीत आहे. तो ग्रेट खलीवर सिनेमा बनवू इच्छितो. याच वेळी ग्रेट खली या ऑफरवर खूप आनंदीत झाला. खली बोलला की, 'असं आहे तर मला आजपासून रेसलर नाही तर द ग्रेट खली हिरो म्हणा.'
एका सामन्यात सोनूने 'पाकिस्तानच्या पहेलवांनाला धूळ चारली. तो एक रोमांचक क्षण होता जेव्हा एक पुरुष आणि एक बुरखा घातलेली महिला रिंगमध्ये पाकिस्तानचा ध्वज घेवून आले.
रिंगमध्ये प्रवेश करताच सोनू सूदने पाकिस्तानी कुस्तीपटूवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर त्याला रिंगमधून बाहेर फेकून दिले. त्यानंतर, बुरखा घातलेली स्त्री रिंगमध्ये आली आणि सोनू सूदला डान्स करण्यासाठी सांगू लागली.
सोनू सूदने या महिलेसोबत खूप डान्स केला. हे सर्व इतके मजेदार होते की प्रेक्षक हसून हसून वेडे झाले. या प्रसंगी, खलीने म्हटलं की, पंजाबमध्ये कुस्तीमध्ये प्रचंड क्षमता आहे. याचं दर्शन घडण्यासाठी सोनूला आमंत्रित केले आहे.
एक दशक WWE मध्ये सहभागी असलेला रेसलर खली आता यामधून निवृत्त झाला आहे. तो आता भारतीयांना यामध्ये नेण्याचं स्वप्न पूर्ण करत आहे.