मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील नेपोटिझम आणि गटबाजीवर जोरदार चर्चा रंगली आहे. आता या घटनेनंतर सोनू निगमचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सोनू निगमने म्हटलं आहे की,'म्युझिक इंडस्ट्रीत गटबाजी संपली नाही तर इथे देखील आत्महत्या झाल्याची बातमी कानावर येईल.' सोनू निगम एवढ्यावरच थांबला नाही त्याने एका संगीत कंपनीच आणि अभिनेत्याचं नाव घेतलं आहे.
सोनू निगम या व्हिडिओत म्हणतो की,'आपल्या नजरेसमोर तरूणाची आत्महत्या होणं ही खूप धक्कादायक बाब आहे. कुणी निष्ठुर असेल त्यालाच सुशांतच्या जाण्याने फरक पडलेला नसेल. मी माझ्या म्युझिक इंडस्ट्रीला विनंती करतो की, आज सुशांतने आत्महत्या केली आहे. एका अभिनेत्याची आत्महत्या झाली आहे. उद्या एका गायकाची आत्महत्या झाली असं कानी पडेल. किंवा कुणा संगीतकार किंवा गीतकाराची आत्महत्या झाली असंही कानी पडू शकतं. कारण संगीताच्या क्षेत्रात असाच एक माफीया आहे.'
सोनू निगम पुढे म्हणतो की,मी समजू शकतो हा व्यवसाय आहे. सगळ्यांना वाटतं की, पूर्ण व्यवसायावर आपलंच शासन असावं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मी कमी वयात या क्षेत्रात आलो आणि या परिस्थितीतून निघून गेलो. आता जी नवीन मुलं येत आहेत त्यांना खूप कठिण परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार कोणत्या कलाकारासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात मात्र म्युझिक कंपनी मात्र हा आमचा आर्टिस्ट नाही असं म्हणून ती गोष्ट नाकारतात.
सोनू निगमने २ म्युझिक कंपन्यांवर आरोप केला आहे. तसेच सध्या अभिनेता सलमान खानचं नाव चर्चेत आहे. त्याच्यावर देखील सोनू निगमने आरोप केला आहे. सलमान खानने अरजित सिंहला जो विरोध केला आहे त्यामुळे त्याचं करिअर खराब झालं आहे. हा देखील आरोप केला आहे.