Sonam Kapoor Lehenga at NMACC: काही दिवसांपुर्वी मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Amabani) यांनी आपल्या कल्चरल सेंटरचे थाटात उद्घाटन केले. यावेळी जगभरातील अनेक मोठे मोठे सेलिब्रेटी या एनएमसीसी गालासाठी (NMACC Gala) उपस्थित होते. एव्हाना सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले सेलिब्रेटींच्या फॅशनस्टाईल्सभोवती. या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (Nita Mukesh Ambani Cultural Centre) जगभरातील कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन केले जाणार आहे. हस्तकलेपासून, आकर्षक कपडे, कला, संगीत अशा नाना तऱ्हेच्या कलेचे प्रदर्शन (Art Exibhition) येथे रसिकजनांना पाहायला मिळणार आहे.
यंदा सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे अंबानींच्या या उच्चभ्रू थाटाची. एनएमसीसी गालामध्ये (NMACC) आलेल्या पाहूण्यांपासून ते पाहूण्यांना दिलेल्या चांदीच्या ताटातील जेवणापर्यंत, सगळ्यांचीच चर्चा झाली. बड्या सेलिब्रेटी मंडळींनी यावेळी त्यांच्या आवडत्या गाण्यावर तालही धरला आणि या पार्टीत चार चांद लावले. यावेळी बॉलिवूड सेलिब्रेटीच्या काही खास महागड्या गोष्टीही या सेंटरमध्ये रसिकांना पाहायला मिळणार आहेत.
2018 साली अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor Lehenga at NMACC) हिनं घातलेला हो लाल रंगाचा भरझरी लेहेंगा तुम्हाला आठवतोय ना? जवळपास तिचा हा खास लेहेंगा बनवायला 6 महिन्यांचा कालावधी लागला होता. ज्या लेहेंग्याची किंमत ही लाखोंच्या घरात आहे.
या तिच्या महागड्या लेहेंग्याचे दर्शन तु्म्हाला या कल्चरल सेंटरमधून घेता येणार आहे. सोनम कपूर ही आपल्या फॅशन सेन्ससाठी (Sonam Kapoor Fashion) ओळखली जाते. तिचा लुक कोणताही असो, तो ट्रेडिशनल असो वा मॉडर्न. ती हरएक लुकमध्ये खुलून दिसते. तिच्या लग्नसोहळ्यातही वधूच्या लुकमध्ये ती अगदी शाही लुकमध्ये दिसत होती. या लुकची तेव्हा पुष्कळ चर्चाही झाली होती. हा सोनमचा लाल रंगाचा लेहेंगा तयार करायला तब्बल 6 महिने लागले होते. हा तिचा लेहेंगा लाखोंच्या घरात असून आता तो नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये दिसणार आहे. सोनमनं इन्टाग्राम स्टोरी टाकून याची माहिती दिली होती.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, हा लेहेंगा फॅशन डिझानयर अनुराधा वकिल हिनं डिझाईन केला होता. या लेहेंग्याला सोन्याच्या आणि रेशमाच्या धाग्यांनी सजवले होते. या लेहेंग्याची किंमत (Sonam Kapoor Wedding Lehenga Price) 80-90 लाखांच्या आसपास आहे. सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांचे लग्न हे 6 मे 2018 साली झाले होते.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या सोहळ्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी अंबानींचा शाही थाट पाहून अनेक ट्रोलर्संनी ट्रोलही केले होते.