Sonam Kapoor ची सासू तिच्या इतकीच सुंदर, फॅशनमध्ये सोनमला देते टक्कर

Sonam Kapoor च्या सासूला तुम्ही कधी पाहिलत का? त्यांचे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल... तर अनेकांनी विचारले नक्की सासूच आहे ना... प्रिया आहुजा सुंदरतेत सोनम कपूरला देतात टक्कर... आनंद आहुज्याच्या आईला कधी पाहिलेत का फोटो ठरतायत चर्चेचा विषय... एकदा तुम्हीही पाहाच

Updated: Mar 2, 2023, 07:57 PM IST
Sonam Kapoor ची सासू तिच्या इतकीच सुंदर, फॅशनमध्ये सोनमला देते टक्कर title=

Sonam Kapoor and her Mother In Law : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम ही तिच्या फॅशन आणि सुंदरतेसाठी ओळखली जाते. सोनम सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोनम चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोनम जितकी सुंदर आहे तितकीच सुंदर तिची सासू आहे. सोनम बऱ्याचवेळा तिच्या सासू सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सोनम कपूरनं आनंद अहुजाशी (Priya Ahuja) लग्न केलं असून तिच्या सासूचे नाव प्रिया आहूजा आहे. त्या दोघींना एकत्र पाहिलं की त्यांना कोण सासू-सून नाही तर आई आणि मुलगी आहे असं म्हणतील...

सोनमचं लग्न हे बिझनेसमॅन आनंद आहुजाशी झालं आहे. आनंद हा दिल्लीचा आहे. त्यात सोनम भारतात आल्यावर बराचवेळ तिच्या दिल्लीतील घरी काढते. प्रिया या फक्त स्टायलिश आणि वेस्टर्न ड्रेस नाही तर त्यासोबत ट्रेडिश्नल ड्रेसमध्ये देखील सुंदर दिसतात. प्रिया या वयानं 50 वर्षांपेक्षा जास्त आहेत. प्रिया यांच्या स्टाईलपासून त्यांच्या हेअर स्टाईलपर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी चर्चेत असतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनमनं कपूरनं काही दिवसांपूर्वी तिच्या सासूच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. यावेळी सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष हे सोनमची सासू प्रिया आहूजानं वेधले. नेटकरी त्यांचे फोटो पाहतच राहिली इतकेच काय तर अनेकांनी त्यावर कमेंट करत प्रिया यांच्या सुंदरतेची स्तुती केली आहे. प्रिया आहुजा या सोनम प्रमाणेच स्टायलिस्ट आहेत. प्रिया यांच्या स्टाईलनं खरंतर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : Amitabh Bachchan यांच्यासोबत 'चिनी कम'मध्ये काम केलेल्या 'त्या' चिमुकलीचा झाला साखरपुडा; पाहा खास फोटो

सोनम आणि प्रिया यांच्यात खूप चांगले नाते आहे. सोनम ज्या प्रकारे तिच्या आईसोबत वेळ व्यथित करते आणि फिरायला जाते त्या प्रमाणेच ती सासु प्रियासोबतही वेळ व्यथित करते. दरम्यान, सोनमनं तिच्या सासुला वाढदिवसाच्या दिवशी पोस्ट शेअर करत कॅप्शन दिलं की ज्या प्रकारे तुम्ही आनंदचे संगोपन केले, तशीच शिकवण मी तुमच्याकडून माझा मुलगा वायूसाठी मागते. मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखी सासू भेटली. आई माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.