Sonam-Anand यांच्या Vaayu चा आणखी एक Cute फोटो समोर

Sonam-Anand Baby : वायूचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 21, 2022, 03:03 PM IST
Sonam-Anand यांच्या Vaayu चा आणखी एक Cute फोटो समोर title=
Sonam Kapoor Anand Baby Vaayu another beautiful click nm

Sonam-Anand Baby Vaayu : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) आपल्या मुलांचं नाव सोशल मीडियावर जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर सोनम कपूर आणि आनंद अहुजा (Anand Ahuja) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सोनमला 20 ऑगस्ट 2022 ला मुलगा झाली. या आनंदाच्या बातमीनंतर कपूर आणि अहुजा कुटुंबात वेगळाच उत्साह पाहिला मिळतो आहे. 

सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर त्रिकोणी कुटुंबाचा फोटो शेअर करत 'वायू' नावं ठेवल्याचं सांगितल. सेलिब्रिटी आपल्या मुलांचं नाव काही तरी वेगळी ठेवतात. अशात सोनम आपल्या मुलाचं नाव काय ठेवणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. मंगळवारी तिने मुलांचं नाव सगळ्यांना सांगितलं. (Sonam Kapoor Anand Baby  Vaayu another beautiful click nm )

सोनम आणि आनंद मुलाच्या आगमनाने खूप आनंदी आहेत की, ते सोशल मीडियावर आपलं आनंद सतत व्यक्त करताना दिसतात. वायूचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्येही तिघांनी मॅचिंग रंगाचे पिवळे कपडे घातले आहेत. सोनम आणि आनंद त्यांचा मुलाला पाहताना दिसतं आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

>