सोनाली कुलकर्णीचा लेहेंगा आहे खास...किंमत ऐकून व्हाल हैराण..

जवळपास 13 वर्ष जुना हा लेहंगा आहे तरीही सोनालीला तो अतिशय फिट बसलाय 

Updated: Aug 15, 2022, 01:57 PM IST
सोनाली कुलकर्णीचा लेहेंगा आहे खास...किंमत ऐकून व्हाल हैराण..  title=

SONALI KULKARNI WEDDING PHOTOS: प्लॅनेट मराठी वर सध्या लगीनघाई आहे ती सोनाली कुलकर्णीच्या आणि कुणालच्या लग्नाची ..नुकतेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) मेहेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. जेव्हा सोनालीचं लग्न झालं तेव्हा कोविडचा काळ असल्यामुळे कोणी लग्नाला उपस्थित राहू शकलं नव्हतं मात्र आता प्लॅनेट मराठीच्या उपक्रमामुळे सोनालीचं हे स्वप्न पूर्ण झालं आणि पुन्हा एकदा सर्वांच्या उपस्थित तिच्या लग्नाचा सोहळा संपन्न होतोय आणि त्याचे खास फोटो देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 

नुकतेच सोनालीने हळदीचे फोटो शेअर केले होते यात ती प्रचंड सुंदर दिसत होती. यावेळी सोनालीच्या लेहेंग्याची खूप चर्चा झाली होती. कारण सोनालीसाठी हा लेहेंगा खूप खास असल्याचं सोनाली सांगते 2012-203साली जेव्हा सोनालीकडे पैसे आले होते. तेव्हा काहीतरी महागडं स्वतःसाठी घ्यावं असं तीच स्वप्न होत आणि त्या पैशातून तिने स्वतःसाठी हा कलरफुल लेहेंगा घेतला होता म्हणजे जवळपास 13 वर्ष जुना हा लेहंगा आहे तरीही सोनालीला तो अतिशय फिट बसलाय याच हि कौतुक केलं जात आहे आणि यावरून सोनाली आपल्या फिटनेसकडे किती लक्ष देते हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे 

हळदीचे फोटो शेअर करत सोनालीने कॅप्शनमध्ये, 'खूप मजा, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, संगीत..' असं लिहिलं आहे. लंडनमध्ये पार पडलेल्या हळदीच्या कार्यक्रमाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.'