"बॉलिवूडची कॉपी कॅट", म्हणणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Updated: Jul 21, 2022, 05:32 PM IST
"बॉलिवूडची कॉपी कॅट", म्हणणाऱ्याला सोनाली कुलकर्णीचं सडेतोड उत्तर, म्हणाली... title=

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाली ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सोनाली चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनालीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो काही नेटकऱ्यांना आवडले तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

सोनालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनालीने काळ्या रंगाचा पोलका डॉट असलेला ड्रेस परिधान केला आहे. हे फोटो शेअर करत तमाशा लाइव्हला दिलेल्या प्रेमासाठी तिने आभार मानले आहे. आमच्या चित्रपटाला मीडिया इंडस्ट्रीकडून खूप प्रेम मिळालं आता तुमची वेळ आहे. जवळच्या चित्रपटगृहात जाणून चित्रपट नक्कीच पाहा, असे कॅप्शन सोनालीने दिलं आहे. 

दरम्यान, काही नेटकऱ्यांना सोनालीचे हे फोटो काही आवडले नाहीत. त्यांनी सोनालीला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी सोनालीला ट्रोल करत म्हणाला, "तुमच्या होणाऱ्या बाळासाठी शुभेच्छा...नाव काय ठेवणार? मुलीचं सोनालीका ठेवा आणि मुलाचं सोंगाड्या ठेवा." तर दुसरा नेटकरी म्हणाला, "प्रेग्नंट झाली वाटतं बॉलिवूड कॉपी कॅट." मात्र, या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देत सोनाली म्हणाली, "मुर्ख आहेस का?" 

सोनालीचा नुकताच तमाशा लाइव्ह हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी आणि सचिन पाटील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत