सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार सोनाक्षी, बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा 'मंडी'

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या कारकिर्दीची सुरूवात दबंग चित्रपटातून सलमान खानबरोबर केली. 

Updated: Jul 5, 2021, 09:18 PM IST
सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार सोनाक्षी, बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा 'मंडी' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या कारकिर्दीची सुरूवात दबंग चित्रपटातून सलमान खानबरोबर केली. या चित्रपटापासून सोनाक्षीने वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांत काम केलं आहे. आता अलीकडेच सोनाक्षी सिन्हाच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. सोनाक्षी आता संजय लीला भन्साळींसोबत काम करणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या नवीन चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाला साईन केलं आहे. हा सोनाक्षीच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा चित्रपट असल्याचं सिद्ध होईल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

या चित्रपटात सोनाक्षी करणार काम 
सोनाक्षी संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'हीरा मंडी' चित्रपटात दिसणार आहे. एका वृत्तानुसार संजयने आपल्या चित्रपटासाठी दोन बॉलिवूड अभिनेत्रींची निवड केली आहे. सोनाक्षी सिंन्हाला चित्रपटासाठी साईन करण्याआगोदर निर्मात्यांनी हुमा कुरेशीला या चित्रपटासाठी साईन केलं आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शनमध्ये 'राउडी राठोड' या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने काम केलं होतं. पण आता ती संजय लीला भन्साळीसोबत पहिल्यांदा 'हीरा मंडी'मध्ये काम करणार आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांनी अधिकृतपणे सोनाक्षीच्या कास्टिंगची घोषणा केलेली नाही.

सोनाक्षीची भूमिका कशी असेल?
एका वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार आहे.  या महत्त्वाच्या भूमिकेसाठी सोनाक्षीने आधीच तयारी सुरू केली आहे. या भूमिकेत येण्यासाठी अभिनेत्री स्वत: वर काम करत आहे. एवढंच नव्हे तर अगदी सोनाक्षी कथ्थक देखील शिकतं आहे असंही म्हटलं जात आहे. संजय लीला भन्साळीची 'हिरा मंडी' एक मेगा बजेट वेब सीरिज असेल.

सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या आगामी 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटासाठी चर्चेत आहेत. या चित्रपटात अजय देवगन आणि संजय दत्त सारखे अनेक कलाकार सोनाक्षीसोबत दिसणार आहेत. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनाक्षीने आतापर्यंत लुटेरा, दबंग, आर राजकुमार, अकिरा, कलांक, मिशन मंगल, सन ऑफ सरदार अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे