सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात 'या' अभिनेत्यानं बजावलं भावाचं कर्तव्य; सख्खे भाऊच गैरहजर?

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्रीचे सख्खे भाऊ लव-कुश आहेत कुठे? ते लग्नात उपस्थित नव्हते का? 

Updated: Jun 24, 2024, 12:33 PM IST
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात 'या' अभिनेत्यानं बजावलं भावाचं कर्तव्य; सख्खे भाऊच गैरहजर?   title=

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं जवळपास 7 वर्षांच्या प्रेमाच्या नात्याला नवं नाव देत प्रियकर झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. कुटुंबीय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत या जोडीनं रजिस्टर पद्धतीनं लग्न करत एकमेकांची साथ निभावण्याची वचनं दिली. 

इथं सोनाक्षी आणि झहीरनं त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आणि तिथं त्यांच्या या विवाहसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच व्हिडीओ आणि फोटोंच्या गर्दीत काही दृश्यांनी ससर्वांच्या नजरा वळवल्या. व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री आणि सोनाक्षीची चांगली मैत्रीण, हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम सोनाक्षीच्या लग्नात भावाची जबाबदारी पार पाडताना दिसला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

सोनाक्षीला विवाहस्थळी नेण्यासाठी साकिबनं पुढाकार घेतल्याचं यावेळी पाहाला मिळालं. हे पाहून अनेकांनीच त्याचं कौतुक केलं. तर, काहींच्या मनात एकच प्रश्न आला. तो म्हणजे, अभिनेत्रीचे सख्खे भाऊ लव-कुश आहेत कुठे? ते लग्नात उपस्थित नव्हते का? 

सोनाक्षीचे भाऊ लव-कुश लग्नात दिसत नव्हते...

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाचे व्हायरल झालेले फोटो चाहत्यांची मनं जिंकून गेले. पण, या फोटो आणि व्हिडिओंमध्ये अभिनेत्रीचे भाऊ लव-कुश कुठेही दिसले नाहीत. तर, साकिब सलीम सोनाक्षीच्या लग्नात भावाचं कर्तव्य बजावताना दिसला. ज्यामुळं आता अभिनेत्रीच्या कुटुंबातील समीकरणाचीच पुन्हा एकदा चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. 

हेही वाचा...  बॉडीगार्डनं दिव्यांग चाहत्यासोबत केलेली वागणूक भोवली! नागार्जुनला मागावी लागली माफी 

दरम्यान, सोनाक्षीच्या या नात्याती अतिशय सुरेख वळणावर सुरुवात झाली असून, लग्नाच्या वेळी तिनं ऑफ व्हाईट शेडमधील सुंदर साडीला पसंती दिली होती. तर, झहीरही त्याच्या शेरवानीमध्ये रुबाबदार दिसत होता. लग्नानंतरच्या पार्टीवेळी सोनाक्षीनं लाल रंगाची साडी नेसत ब्रायडल लूकनं सर्वांचीच मनं जिंकली. सोनाक्षीच्या लग्नातील या लूकची सध्या बरीच चर्चा पाहायला मिळत आहे.