...म्हणून विवेक आणि अभिषेक होणार पुन्हा मित्र

विवेकने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'बिग बूल'च्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Sep 18, 2019, 04:50 PM IST
...म्हणून विवेक आणि अभिषेक होणार पुन्हा मित्र title=

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वाद अखेरीस विकोपास गेला आहे. एका कार्यक्रमादरम्यान या दोघांनी एकमेकांची भेट घेतली होती. आता सर्व वाद विसरून विवेकने अभिषेकला त्याच्या आगामी 'बिग बुल'साठी शुभेच्छा दिल्या आहेत. फार मोठ्या काळा पासून यांच्यातील वाद चर्चेत होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील मैत्रीचे नाते बहरत आहेत. 

विवेकने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'बिग बूल'च्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. विवेकने अभिषेक आणि अभिनेता अजय देवगनच्या 'बिग बूल' चित्रपटासाठी ऑल द बेस्ट दिले आहे. ट्विटरच्या माध्यामातून त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. '"बिग बूल"च्या संपूर्ण टीमला खुप अभिनंदन. अभिषेक आणि अजय यांच्या बरोबरच सर्वांना खुप शुभेच्छा.' असे त्याने ट्विटरवर म्हटले आहे. 

विवेकने अभिषेक बच्चन, एश्वर्या रॉय, सलमान खान आणि आराध्या बच्चन यांच्या फोटोंचा वापर करून एक मीम सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर त्यांच्यातील वाद चांगलाच भडकला होता. त्यानंतर विवेकने सोशल मीडियाच्या माध्यमातून घडल्या चूकीची माफी देखील मागितली होती.

अभिषेक आणि अजयने यापूर्वी सुद्धा एकत्र स्क्रिन शेअर केली होती. त्यामध्ये सर्वप्रथम राम गोपाल वर्मा यांचा 'आग' चित्रपट त्याचप्रमाणे 'जमीन', 'युवा' आणि 'बोल बच्चन' या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते.