मुंबई : चार भिंतींना घर बनवणाऱ्या आईला नेहमी ऐकवलं जात तू पूर्ण दिवस घरात बसून काय करते. संपूर्ण आयुष्य घराला घरपण देणाऱ्या आईला अनेक प्रश्नांना सामोरं जाव लागतं. मुलांना लहाणाचं मोठ आई करते. स्वत:च्या सर्व इच्छा मारून फक्त आपल्या घरासाठी कायम झटत असते, तरी अखेर तिला प्रश्न विचारला जातो पूर्ण दिवस तू घरात काय करत असते. घरातला एखादा व्यक्ति आजारी पडला की तिचा कसा कासावीस होतो, पण स्वत:चं दुखणं बाजुला सारून ती कुटुंबाकडे लक्ष देते. प्रत्येकाच्या गरजा भागवते.
एकेकाळी गाजलेल्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी'. मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. तुलसी ही भूमिका साकारलेल्या खासदार स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ अत्यंत भावूक आणि ह्रदयस्पर्शी आहे. आई संबंधीत भाष्य करणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या झी टीव्हीवर 'अग्गंबाई सासूबाई' मालिका चांगलीच गाजत आहे. सासू-सूनेच्या अनोख्या आणि प्रेमळ नात्यचं बंधन या मालिकेत उत्तम रित्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुरूष हा घरातला कर्ता व्यक्ति असतो कारण तो कमतो.
बायको सुद्धा कामाला जाते म्हणून ती मॅर्डन बायको. पण आई करते ते सुद्धा कष्ट आहेत. एक सून कशाप्रकारे आपल्या सासूची बाजू मांडते हे या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान मालिकेत सूनेची व्यक्तिरेखा साकारत आहे.