अभिनेत्री स्मिता तांबे अडकली विवाह बंधनात

स्मिता तांबेने अभिनेता विरेंद्र द्विवेदीसोबत मुंबईत 18 जानेवारी रोजी लग्न केलं आहे.

Updated: Jan 19, 2019, 12:58 PM IST
अभिनेत्री स्मिता तांबे अडकली विवाह बंधनात  title=

मुंबई : आता कुठे लग्नांच्या चर्चांना शांतता मिळाली होती तेवढ्यातच आणखी एक मराठमोळी अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या अभिनयाने सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी ही अभिनेत्री हटके भूमिकांमुळे ओळखली जाते.  'जोगवा', '72 मैल' यासारख्या सिनेमांमधून आपल्या इंन्टेस भूमिकेकरता ओळखली गेलेली अभिनेत्री स्मिता तांबे लग्नबंधनात अडकली आहे. 



स्मिता तांबेने अभिनेता विरेंद्र द्विवेदीसोबत मुंबईत 18 जानेवारी रोजी लग्न केलं आहे. विरेंद्र द्विवेदी हा नाट्य कलाकार असून हे लग्न महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने पार पडलं आहे. या लग्नाचे फोटो अभिनेत्री आणि स्मिताची अगदीजवळची मैत्रिण रेशम टिपणीसने शेअर केले आहेत. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Congratulations Mr & Mrs Dwivedi.

A post shared by Resham Tipnis (@tuffnut10) on

स्मिताने 2019 च्या सुरूवातीला विरेंद्रसोबत आपल्या जीवनाची नवी इनिंग सुरू केली आहे. 'अनुबंध'सारखी मालिका, 'तुकाराम', 'जोगवा', '७२ मैल', 'गणवेश', 'परतु'सारखे सिनेमे किंवा 'हमिदाबाईची कोठी'सारखं अजरामर नाटक या आणि अनेक कलाकृतींमधून आपल्या समर्थ अभिनयानं स्वतःचा ठसा उमटवलेली अभिनेत्री स्मिता आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Very happy married life darling Smita .May u get my share of happiness too .

A post shared by Resham Tipnis (@tuffnut10) on

 भूमिका कोणतीही असो, व्यक्तिरेखेच्या विचारांनी त्या भूमिकेवर स्वतःचा ठसा उमटवणारी कलावंत आहे.