मुंबई : पप्पी दे पप्पी दे पारूला फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर ही अभिनयाबरोबरच खेळातही रूची ठेवते. स्मिताला अभिनयासोबतच कार रेसिंग हा प्रकार देखील तेवढाच जास्त आवडतो. रेसिंग खेळ हा अत्यंत गणिताचा खेळ आहे. त्यामध्ये तुम्ही जरापण गोंधळ नाही घालू शकत नाही.
नुकतंच तिने फॉर्म्युला 4 रेसिंगमध्ये सहभाग घेतला होता. अहुजा रेसिंग टीमचा भाग असलेली स्मिता JK Tyre #FestivalofSpeed 2019 मध्ये सहभागी झाली होती.
यामध्ये सहभाग घेतल्यामुळे मी अतिशय खूष असल्याच स्मिता सांगते. शुटिंगचं शेड्युल सांभाळत स्मिताने या रेसिंगमध्ये सहभाग घेतला. रेसिंगच्या प्रेमाखातर मी काहीही करू शकते, असं स्मिता सांगते.
मला आनंद आहे की, मी टेक्निकल गोष्टी खूप लवकर स्विकारते. मी असं म्हणणार नाही की, हा खेळ सोपा होता. पण मोटर स्पोर्ट्सबद्दल असलेलं माझं प्रेम मला हे करायचं बळ देतात हे नक्की, असं देखील स्मिता म्हणाली.
स्मिताच्या कुटुंबामध्ये 'हा' किडा असल्याचं स्मिता सांगते. स्मिताचे चुलत भाऊ या सगळ्या क्षेत्रात आहेत. त्यांना सायकल रेसिंग, बाईक रेसिंग आणि कार रेसिंगमध्ये आवड आहे. त्यांच्याकडून याचं बाळकडू मिळाल्याचं स्मिता एका मुलाखतीत सांगते. 2017 मध्ये स्मिताने पहिलं रेसिंग केलं. स्मिताने ऑफ रोड रेसिंग देखील केली असून आतापर्यंत गोवा, इंदौर, पुणे आणि गुवाहाटी परिसरात रेसिंग केलं आहे. या सगळ्या रेसिंगमध्ये स्मिता फास्टेस वुमन ठरली. या सगळीकडे तिला बक्षिस देखील मिळाली, ही माहिती स्मिताने बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.