Pankaj Tripathi Real Name : अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आज ते प्रत्येक दिग्दर्शाची पसंत ठरले आहेत. स्वप्नाचं शहर असणाऱ्या मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांचं अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आजवर पंकज त्रिपाठी यांनी ‘कालीन भईया’, ‘रुद्र भईया’ सारख्या भूमिका साकारल्या आहेत. पण या सगळ्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करल्या असून त्यांचं खरं नाव काय हे जवळपास 90-99 टक्के लोकांना माहित नाही. आता तुम्हाला वाटत असेल की त्यांचं नाव हे पंकज त्रिपाठी आहे जे सगळ्यांना माहित आहे. मात्र, त्यांचं खरं नाव हे पंकज त्रिपाठी नाही. त्यांनी खूप कमी वयात त्यांच्या वडिलांना देखील एक वेगळी ओळख दिली.
पंकज त्रिपाठी यांना विश्वास होता किंवा अंधश्रद्धा ते माहित नाही, पण त्यांना वाटत होतं की ती त्रिपाठी या आडनावानं ते आयुष्यात खूप पुढे जाणार. पंकज त्रिपाठी यांनी 10 वीत असताना त्यांचं नाव बदललं. त्यांनी याविषयी ‘आपकी अदालत’ या कार्यक्रमात रजत शर्मा यांना याविषयी सांगत खुलासा केला होता की त्यांचं खरं नाव हे पंकज तिवारी नाही. 10 वीत फॉर्म भरताना त्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या वडिलांचं देखील नाव बदललं होतं.
पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं की 'त्यांचे काका होते जे त्रिपाठी लिहायचे आणि ते एक ऑफिसर होते. त्याविषयी सांगत पंकज त्रिपाठी म्हणाले, जे त्रिपाठी लिहायचे ते उच्च शिक्षीत असायचे आणि आयुष्यात खूप यशस्वी झाले, पण तिवारी आडनाव असणारे पूजा आणि शेती या सगळ्या गोष्टी करण्यात अडकून राहायचे.'
हेही वाचा : सैफ अली खाननं का काढला होता करीनाच्या नावाचा टॅट्टू? बेबोचा मोठा खुलासा
पंकज यांच्यामते त्यांना शेती आणि पूजा-अर्चना करायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी नाव बदलून टाकलं. त्यांनी स्वत: चं नाव पंकज तिवारी ऐवजी त्रिपाठी केलं. त्यानंतर जेव्हा वडिलांच्या नावाची वेळ आहे तर त्यांना वाटलं त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात येईल आणि या कारणामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांना देखील एक वेगळी ओळख दिली. 10 वी नंतर त्यांचं नाव पंकज तिवारी ऐवजी पंकज त्रिपाठी झालं आणि त्यांच्या वडिलांचं नाव पंडित बनारस त्रिपाठी झालं. त्यांनी नाव बदलल्याचा किस्सा खूप चर्चेत राहिला. पंकज त्रिपाठीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते 15 ऑगस्टो रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री 2’ मध्ये दिसले होते.