अन् गाता गाता तोशी साबरी स्टेजवरून पडला

व्यसन आणि प्रसिद्धीची नशा डोक्यात डोक्यात गेली की अध:पतन होणं हे अटळ असते.

Updated: Sep 7, 2017, 12:52 PM IST
अन् गाता गाता तोशी साबरी स्टेजवरून पडला   title=

दिल्ली : व्यसन आणि प्रसिद्धीची नशा डोक्यात डोक्यात गेली की अध:पतन होणं हे अटळ असते.

असाच काही प्रकार गायक तोशी साबरीसोबत घडला आहे.स्टेजवरून गाताना तोशी खाली पडला. 

दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये ‘अर्जियाँ’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी तोशीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर त्याने बारमध्ये जाण्याचा बेत आखला.तेथील माहोल पाहून तोशी स्वत:ला रोखू शकला नाही आणि तो थेट स्टेजवर गेला. उपस्थित अनेकांनीच त्यादरम्यान तोशीला चिअर करण्यास सुरुवात केली. प्रेक्षकांकडून आपल्याला मिळणारी दाद पाहून तो हुरळून गेला. 

दारूच्या नशेत गाता गाता त्याचा स्टेजवरून तोल गेला आणि तो खाली प्रेक्षकांमध्ये पडला. यानंतर तेथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काही जण फोटो काढण्यासाठी तर काही सारा प्रकार व्हिडिओ स्वरूपात शूट करण्यासाठी धावले. त्यापैकी काही जणांनी घडलेला प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे.