Singer Armaan Malik Get's Angry : 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये मागच्या वीकेंड वारमध्ये जो काही गोंधळ झाला त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले. हा सगळा गोंधळ हा युट्यूबर अरमान मलिकनं जेव्हा विशाल पांडेला कानशिलात लगावल्यानंतर झाला. तर अरमाननं यामुळे विशालला कानशिलात लगावली कारण त्यानं त्याची दुसरी पत्नी क्रितिकावर कमेंट केली होती. विशानं म्हणाला की क्रितिका मलिक त्याला आवडते. त्यावरून अरमान आणि विशालमध्ये वाद झाला आणि अरमाननं त्याला कानशिलात लगावली. आता अरमानच्या त्या कृतीची सगळीकडे चर्चा सुरु होती. त्यानंतर नेटकरी हे अरमान मलिकला ट्रोल करताना दिसले, इतकंच नाही तर अनेकांनी अपशब्द वापरलेत. त्यामुळे बॉलिवूड सिंगर अरमान मलिकला त्रास होऊ लागला आहे.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अरमान मलिक ट्रोल होतोय तर त्याचा गायकाला का त्रास होतोय? तर त्याचं कारण म्हणजे यूट्यूबर अरमान मलिकचं आणि गायक अरमान मलिकचं नाव एकसारखं आहे. त्यामुळे अनेक लोक युट्यूबरला टॅग करण्याच्या जागी गायकाला टॅग करत आहेत. ज्यामुळे त्याला या सगळ्याचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे गायक अरमान मलिक संतापला आहे त्यानं एक पोस्ट शेअर करत त्याचा आक्रोश व्यक्त केला आहे. सिंगर अरमानचं म्हणणं आहे की एकच नाव असल्यानं लोकांचा गोंधळ होतोय आणि त्यामुळे याची इमेज खराब होतेय. त्यानं सांगितलं की बऱ्याच दिवसांपासून तो या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतोय. पण आता तो यावर अखेर बोलतोय. त्यानं लिहिलं की 'मी गेल्या काही काळापासून एका मुद्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, पण आता हे सहनशक्तीच्या पार जात आहे आणि मला याचे समाधान करायचे आहे.'
This had to be said. #ArmaanMalik pic.twitter.com/GB7HjuijtP
— ARMAAN MALIK (@ArmaanMalik22) July 8, 2024
गायक अरमान मलिक पुढे म्हणाला, 'एक युट्यूबर क्रिएटर आहे, जो आधी संदीप नावानं ओळखला जात होता, ज्यानं नंतर नाव बदलून अरमान मलिक केलं आणि सध्या तो 'बिग बॉस ओटीटी सीजन 3' मध्ये स्पर्धक आहे. त्यामुळे खूप गोंधळ होतोय. अनेक लोक चुकून मला टॅग करत आहेत आणि त्यांना वाटतंय की आम्ही एकच व्यक्ती आहोत. माझा या व्यक्तीशी काहीही संबंध नाही आणि मी कोणत्याही प्रकारे त्याची लाइफस्टाइलचं समर्थन करत नाही. ही संपूर्ण परिस्थिती माझं नाव खराब करत आहे आणि ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला आहे अशा अनेकांचा गोंधळ उडत आहे. मी कोणाला त्यांचं नाव बदलण्यापासून किंवा माझं नाव स्वत: ला ठेवण्यापासून रोकू शकत नाही. मी माझ्या कम्युनिटीला विनंती करतो की मला या सगळ्यातून बाहेर पडण्यास मदत करा. कृपया या संबंधीत पोस्टमध्ये मला टॅग करणं बंद करा. तुमच्या पाठिंब्यासाठी आभारी आहे.'
गायक अरमान मलिकनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर त्याचे चाहते त्याला पाठिंबा देत आहेत.