नेहा कक्करनं गुपचूप उरकला रोका?

पाहा हा फोटो बरंच काही सांगतोय....   

Updated: Oct 8, 2020, 04:41 PM IST
नेहा कक्करनं गुपचूप उरकला रोका?  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गायिका नेहा कक्कर neha kakkar ही यंदाच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. नेहा आणि रोहनप्रीत सिंग यांच्या नात्यायबाबतच्या बऱ्याच चर्चांनी चाहत्यांचं आणि अर्थातच साऱ्या कलाविश्वाचं लक्ष वेधलं आहे. आता याच चर्चांच्या वर्तुळात म्हणे नेहानं गुपचूप रोकाही उरकला आहे. 

रोका पार पडल्याच्या चर्चांना देत आहे तो म्हणजे सोशल मीडियायवर व्हायरल होणारा एक फोटो. एका सोशल मीडिया पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये नेहा आणि रोहनप्रीतव्यतिरिक्त आणखी दोन व्यक्तीही दिसत आहेत. असं म्हटलं जात आहे की हे रोहनप्रीतचे पालक किंवा त्याच्या कुटुंबीयातीस व्यक्ती असाव्यात. 

नेहा आणि रोहनप्रीतचा रोका पार पडल्याची दाट शक्यता व्यक्त करत काही चाहत्यांनी हा व्हायरल फोटो पाहताच तिच्या हातात दिसणाऱ्या वस्तूंकडे सर्वांचं लक्ष वेधलं. आता रोका म्हटलं की उत्सवादरम्यानचा पेहराव आलाच. पण, नेहा आणि रोहनप्रीत मात्र अगदी साध्या पेहरावात दिसत आहेत. 

 

मुख्य म्हणजे या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत, किंवा लग्नाच्या चर्चांबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळं या फोटोमागचं नेमकं गुपित काय, आणि नेहा- रोहनप्रीत त्यांच्या नात्याची अधिकृत ग्वाही केव्हा देणार याचीच उत्सुकता आता चाहत्यांना लागून राहिलेली आहे.