या गायिकेने कॅमेऱ्यासमोर घातले कपडे...सोशल मीडियावर धुमाकूळ

सुपरबोल्ड गायिका नेहा भसीनने टॉपपासून ऍक्सेसरीज घालण्यापर्यंतचा व्हिडीओ शूट केला आहे.

Updated: May 17, 2022, 02:13 PM IST
या गायिकेने कॅमेऱ्यासमोर घातले कपडे...सोशल मीडियावर धुमाकूळ title=

मुंबईः सुपरबोल्ड गायिका नेहा भसीन तिच्या गाण्यांपेक्षा आणि म्युझिक व्हिडिओंपेक्षा तिच्या हॉट स्टाइलमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा नेहा भसीनचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो तिने स्वतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून नेटिझन्ससोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहाची बोल्ड आणि बिंधास्त स्टाइल पाहायला मिळत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती ऑन-कॅमेरा तयार होताना दिसत आहे. टॉपपासून ऍक्सेसरीज घालण्यापर्यंत अभिनेत्रीने तिच्या ड्रेसिंगचा संपूर्ण व्हिडिओ शूट केला आहे. नेहाची ही बोल्ड स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहे आणि नेटीझन्स तिचा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा लाइक आणि शेअर करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

व्हिडिओच्या सुरुवातीला नेहा तिच्या कानातले झुमके घालताना दिसत आहे. यानंतर, ती तिच्या टॉपची पुढची झिप बंद करते आणि नंतर नॉट बांधते. यानंतर नेहा कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी तयार होते. नेहाने या फोटोशूटसाठी रेड कलरचा ट्यूब टॉप आणि लेदर प्रिंटेड जीन्स कॅरी केली आहे. तिने ग्लॉसी न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

नेहा भसीनने तिच्या गाण्यांच्या जोरावर इंडस्ट्रीत खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे. तिच्या जवळपास सर्वच गाण्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. आज देश-विदेशात नेहाचे चाहते आहेत.

नेहा देखील चाहत्यांना कधीही निराश करत नाहीत आणि अनेकदा त्यांच्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडली जाते.. नेहा तिच्या गाण्यांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळे देखील चर्चेत येऊ लागली आहे.