मुंबई : गायक मिका सिंगने अमेरिकेहून एका व्हिडीओद्वारे खुलासा केलाय. माझ्या कार्यक्रमाविषयी गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत हा कार्यक्रम भारतीयांसाठी आहे.
भारतीय असण्याचा मला अभिमान आहे. सगळ्यात आधी माझा देश आणि त्यानंतर पाकिस्तान असंही त्याने ठणकावून सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे, अमेय खोपकर आपण कुठलीही चिंता करू नका असं त्याने सांगितलं.
भारत आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मिका सिंग अमेरिकेत 12 आणि 13 ऑगस्टला गाण्यांचा कार्यक्रम करणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी मिकानं जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये हमारा पाकिस्तान असा उल्लेख केल्यानं आक्षेप घेतला जात होता.